साकीनाका बलात्कार प्रकरण : महिनाभरात गुन्हा उघडकीस आणणार, पोलिसांचे आश्वासन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

साकीनाका बलात्कार प्रकरण : महिनाभरात गुन्हा उघडकीस आणणार, पोलिसांचे आश्वासन

प्रतिनिधी : मुंबईसाकीनाका बलात्कारप्रकरणाचा तपास जलद गतीने व्हावा, यासाठी मुंबई पोलिसांनी SIT ची स्थापन केली आहे. येत्या महिनाभरात हा गुन्हा उघडकीस आ

काँगे्रसला गळती !
Ahmednagar : आ.संग्राम जगताप यांची आयटी पार्कला भेट
लोकशाही, सुशासन बळकट करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाची भूमिका महत्त्वाची – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

प्रतिनिधी : मुंबई
साकीनाका बलात्कारप्रकरणाचा तपास जलद गतीने व्हावा, यासाठी मुंबई पोलिसांनी SIT ची स्थापन केली आहे. येत्या महिनाभरात हा गुन्हा उघडकीस आणू, असे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी म्हटले आहे.

ही निंदनीय घटना आहे. या घटनेची माहिती सुरक्षा रक्षकाने पोलीस कंट्रोल रूमला रात्री ३ वाजून २० मिनिटांनी दिली. त्यानंतर तातडीने पोलीस घटनास्थळी पोहचून पीडित महिलेला घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल केले.

सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांनी मोहन चौहानला अटक केली, अशी माहिती पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली. आरोपीला न्यायालयाने २१ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ज्योत्स्ना रासम यांच्याकडे गुन्ह्याच्या तपासाची जबाबदारी देण्यात आली असून एक महिन्यात या प्रकरणाचा तपास पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन नगराळे यांनी दिले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचे आदेश दिले असून त्या दिशेने काम सुरू असल्याचे नगराळे म्हणाले. उपचारादरम्यान, या महिलेचा मृत्यू झाल्याने आरोपींवर लावलेली कलमेही वाढवण्यात आली आहे.

पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे तिचा जबाब नोंदवता आला नाही. त्यामुळे नेमके काय घडले हे अद्याप सांगता येत नाही. मात्र, लवकरच तपासात सर्व गोष्टी उघड होतील, असेही आयुक्त नगराळे यांनी सांगितले.

COMMENTS