Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संभाजीनगरात रंगणार युगंधरा मराठी साहित्य, कला व सांस्कृतिक महोत्सव

छ.संभाजीनगर : युगंधरा मराठी साहित्य, कला व सांस्कृतिक प्रतिष्ठान, युगंधरा प्रकाशन व युगंधरा साप्ताहिक यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या आज रविवारी

कमी पर्जन्यमानाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सजग राहण्याचे विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड यांचे आवाहन
श्रीमती जयश्री सोनकवडे यांना ‘त्या’ व्हिडिओप्रकरणी कायदेशीर नोटीस
देशाचा जिवंत आत्मा म्हणजे खरा हिंदुस्थान – जावेद अख्तर

छ.संभाजीनगर : युगंधरा मराठी साहित्य, कला व सांस्कृतिक प्रतिष्ठान, युगंधरा प्रकाशन व युगंधरा साप्ताहिक यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या आज रविवारी 15 डिसेंबरला 21 पुस्तकांचा भव्यदिव्य प्रकाशन सोहळा व साहित्य संमेलन आयोजित केलेले आहे, अशी माहिती युगंधरा प्रतिष्ठान व युगंधरा प्रकाशनाच्या संस्थापक अध्यक्षा प्रसिध्द कवयित्री सुनिता दिपक कावसनकर यांनी दिली.
सदर कार्यक्रम सामाजिक कार्यकर्ता, ज्येष्ठ पत्रकार अरूणकुमार एस. मुंदडा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्ह होणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटक व विशेष अतिथी प्रसिध्द अभिनेते रोहित देशमुख, नरेंद्र निकुंभ, अमळनेर, कार्यवाह, समरसता साहित्य परिषद, देवगिरी प्रांत, तसेच प्रसिध्द जेष्ठ नाट्य दिग्दर्शक व कवी सतीश इंदापूरकर, पुणे, हे असणार आहेत. प्रमुख पाहूणे व कवीसंमेलध्यक्ष हे पुणे येथील जेष्ठ साहित्यिक अरूण देशपांडे हे आहेत. मुंबई, गोवा, पुणे, नाशिक, नगर, जळगाव, अमळनेर, चाळीसगाव अकोला, अमरावती अशा अनेक शहरातून येणार्या साहित्यिकांच्या मांदियाळीत हा भव्य दिव्य सोहळा संपन्न होणार आहे. 9.00 वाजता कार्यक्रमाचा शुभारंभ-सरस्वती वंदना, दीपप्रज्वलन, सरस्वती पूजन, ग्रंथ पूजनाने होईल. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत व सत्कार होतील..वैयक्तीक पुस्तक प्रकाशन व प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचे प्रकाशन होईल, त्यानंतर साहित्यिक, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील पुरस्कारांचा वितरण समारंभ होईल. दुपारच्या सत्रात काव्यमहोत्सव व स्पर्धा पुरस्कार वितरण समारंभ होईल तसेच काव्यमहोत्सव सन्मानचिन्ह वितरण समारंभ होईल. आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम होवून, कार्यक्रमाची सांगता पसायदानाने होईल.

COMMENTS