Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मराठा आरक्षणावर आज सर्वोच्च सुनावणी

क्युरीटीव्ह पिटीशनवर सुनावणी निर्णयाकडे मराठा समाजाचे लक्ष

छ. संभाजीनगर ः मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाने अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने पदयात्

मराठा आरक्षणाचा मार्ग ठरला
मराठा समाजाचे साखळी उपोषण 25 दिवसांनंतर स्थगित
मराठा आरक्षणासाठी धावपळ सुरू

छ. संभाजीनगर ः मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाने अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने पदयात्रा काढली आहे. या यात्रेला मिळणार्‍या अभूतपूर्व प्रतिसादामुळे सरकारला धडकी भरली असतांना, दुसरीकडे मराठा आरक्षणावर आज बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
या संदर्भात राज्य सरकारच्या वतीने ज्येष्ठ वकिलांची फौज तयार करण्याचे आवाहन मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. या संदर्भात निकाल हा मराठा समाजाच्या बाजूने लागेल, असा विश्‍वास देखील याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी व्यक्त केला आहे. या बाबत छत्रपती संभाजी महाराजांनी देखील फोनच्या माध्यमातून आपल्याकडून माहिती घेतली असल्याचे विनोद पाटील यांनी सांगितले आहे. राज्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु असताना सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या क्युरीटीव्ह पिटीशनकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. या संदर्भातील सुनावणी उद्या सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. या बाबतचा निकाल मराठा समाजाच्या बाजून लागण्याची आशा आहे. त्यामुळे राज्यातील सर्वांचेच लक्ष या सुनावणीकडे लागले आहे. या बाबत सर्वोच्च न्यायालयाने याचिका स्विकारली तर मराठा समाजाच्या आरक्षणाचा मार्ग पुन्हा एकदा सुकर होईल, अशी आशा आहे. त्यामुळे या सुनावणीच्या वेळी राज्य सरकारने वकिलांची फौज तयार करण्याची मागणी मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात याचिकाकर्ते विनोद पाटील म्हणाले की, ’ न्यायमूर्तींच्या दालनात होणार्‍या सुनावणीसाठी भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती खन्ना, न्यायमूर्ती गवई यांच्या समोर होणार आहे.खुली सुनावणी घेण्याची मागणी मराठा समाजाच्या मागणीवर चर्चा होणार आहे. क्युरेटिव्ह पिटीशनचा निकाल मराठा समाजाच्या बाजूने लागेल याबाबत मला विश्‍वास आहे. सरकारला आवाहन ज्येष्ठ विधीतज्ज्ञ यांचे फौज तयार करून मराठा समाजाची बाजू भक्कमपणे मांडावी. समाज म्हणून देशाचे ज्येष्ठ विधीतज्ज्ञ हरीश साळवे, सिंघवी यांना संपर्क साधून त्यांना विनंती केली.

COMMENTS