संजय राऊतांच्या विरोधातील महिलेच्या तक्रारीची मुंबई हायकोर्टाने घेतली दखल

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संजय राऊतांच्या विरोधातील महिलेच्या तक्रारीची मुंबई हायकोर्टाने घेतली दखल

शिवसेनेचे प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांच्या विरोधात एका महिलेने केलेल्या तक्रारीची मुंबई उच्च न्यायालयाने दखल घेतली आहे. सदर प्रकरणी तक्रारीनुसार चौकशी करून २४ जूनपर्यंत अहवाल सादर करावा, असे निर्देश न्या. एस. एस. शिंदे व न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठाने पोलीस आयुक्तांना दिले आहेत.

गुजरातमधील अरवली जिल्ह्यात भीषण अपघात
लातूर जिल्ह्यात एक रुपया विमा हप्ता भरुन पाच लाख शेतकर्‍यांनी काढला पीक विमा!
राष्ट्रीय लोक अदालतमध्ये अहमदनगर राज्यात तिसरा

मुंबई : शिवसेनेचे प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांच्या विरोधात एका महिलेने केलेल्या तक्रारीची मुंबई उच्च न्यायालयाने दखल घेतली आहे. सदर प्रकरणी तक्रारीनुसार चौकशी करून २४ जूनपर्यंत अहवाल सादर करावा, असे निर्देश न्या. एस. एस. शिंदे व न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठाने पोलीस आयुक्तांना दिले आहेत. मानसोपचार तज्ज्ञ असलेल्या सदर महिलेने फेब्रुवारी महिन्यात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि तिच्या पतीच्या वतीने काही गुंड तिच्यावर सतत नजर ठेवून आहेत. तसेच मानसिक छळ करत आहेत, असे तिने याचिकेत म्हटले होते. काय म्हणणे आहे याचिकाकर्तीच्या वकिलांचे याचिकाकर्तीच्या वकील आभा सिंग यांनी सांगितले की, याचिका दाखल केल्यावर तिला अदखलपात्र गुन्ह्यासाठी अटक झाली. तिची पीएच.डी.ची डिग्री बनावट असल्याचा पोलिसांचा दावा आहे. याचिकाकर्ती गेले १२ दिवस कारागृहात आहे. तिने याचिका दाखल केल्यावर पोलीस तिच्यामागे लागले. 

पोलीस आयुक्तांनी लक्ष घालावे!

त्यावर न्यायालयाने म्हटले आहे की, अटकेबाबत स्वतंत्र याचिका दाखल करता येईल. याचिकाकर्तीच्या तक्रारीत पोलीस आयुक्तांनी लक्ष घालावे आणि योग्य ती पावले उचलावीत. तसेच या संदर्भात २४ जूनपर्यंत अहवाल सादर करावा, असे निर्देशही न्यायालयाने दिले. दरम्यान, मार्चमधील सुनावणीत राऊत यांच्या वतीने ज्येष्ठ वकील प्रसाद ढाकेफळकर यांनी सर्व आरोप फेटाळले हाेते. याचिकाकर्ती राऊत यांची फॅमिली फ्रेंड असून त्यांना मुलीप्रमाणे आहे, असे स्पष्ट केले हाेते.

COMMENTS