कॅन्सरग्रस्तांसाठी म्हाडाच्या खोल्या राखीव ठेवण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांची स्थगिती

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कॅन्सरग्रस्तांसाठी म्हाडाच्या खोल्या राखीव ठेवण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांची स्थगिती

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या पुढाकाराने टाटा हॉस्पिटलमधील कॅन्सरग्रस्तांसाठी म्हाडाच्या १०० खोल्या राखीव ठेवण्यात आल्या होत्या.

राजधानीत ‘संविधान दिन’ साजरा
आर.डी.एस.एसच्या मीटिंगमध्ये कोपरगावच्या उर्जा विभागाच्या कामांचा समावेश करा
गुन्हेगारीचा चढता आलेख !

मुंबई : गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या पुढाकाराने टाटा हॉस्पिटलमधील कॅन्सरग्रस्तांसाठी म्हाडाच्या १०० खोल्या राखीव ठेवण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे शरद पवार यांच्या हस्ते या खोल्यांच्या चाव्यांचं वाटपही करण्यात आले होते. मात्र स्थानिक रहिवाशांच्या तक्रारीचे कारण देत मुख्यमंत्र्यांनी या निर्णयाला स्थगिती दिली आहे. 

    महत्वाचे म्हणजे या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीच्या एकाही नेत्याशी चर्चा केली नसल्याचेही समजते. काही दिवसांपूर्वी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी परळमधील टाटा रुग्णालयातील १०० कॅन्सरग्रस्तांसाठी म्हाडाच्या खोल्या राखीव ठेवणार असल्याचा निर्णय जाहीर केला होता. तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते या खोल्यांच्या चाव्यांचे वाटपही करण्यात आले होते. दरम्यान या विरोधात शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी तक्रार केली होती. त्यात ज्या इमारतीमधील खोल्या कॅन्सरग्रस्तांसाठी राखीव ठेवण्यात आल्या होत्या, त्या इमारतीमधील रहिवाशांची तक्रार असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी या प्रस्तावाला स्थगिती दिली आहे. या स्थगितीमुळे महाविकास आघाडीतील घटक पक्ष तसेच मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात मतमतांतरे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

काय होता संपूर्ण निर्णय

संपूर्ण भारतातून परळ येथील टाटा मेमोरियल हॉस्पिटल येथे कॅन्सरबाधित रुग्ण उपचार घेण्यासाठी येत असतात. मात्र, अनेक वेळा येथे येणारे रुग्ण हे गरीब घरातून असल्याने रुग्णाला किंवा त्याच्या नातेवाईकांसाठी राहण्याच्या जागेचा प्रश्न निर्माण होत असतो. अनेक वेळा हे नातेवाईक हॉस्पिटलच्या आजुबाजूच्या परिसरात मिळेल त्या ठिकाणी, फूटपाथावर, पुलाखाली राहत असतात. मात्र त्यानंतर काही सामाजिक संस्था तात्पुरती व्यवस्था करतात, परंतु पुन्हा आहे, ती परिस्थिती निर्माण व्हायची. अखेर यावर कायम स्वरूपी तोडगा काढण्याचे कायम म्हाडाने केले असून त्यांनी टाटा रुग्णालयाजवळ असणाऱ्या इमारतीत १०० फ्लॅट देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार खोल्यांचे नियोजन, देखभालीचे सर्व अधिकार हे टाटा मेमोरियल हॉस्पिटल व्यवस्थापनाला असणार आहेत. यामध्ये शासन कुठलाही हस्तक्षेप करणार नाही, असे गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांनी स्पष्ट केले होते.

COMMENTS