श्रीरामकृष्ण अर्बन सहकारी क्रेडीट सोसायटीला सर्व तरतुदी वजा जाता 2020-21 या आर्थिक वर्षात 3 कोटी 87 लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे.
अहमदनगर/प्रतिनिधी : श्रीरामकृष्ण अर्बन सहकारी क्रेडीट सोसायटीला सर्व तरतुदी वजा जाता 2020-21 या आर्थिक वर्षात 3 कोटी 87 लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत निव्वळ नफ्यात यंदा 14 लाख रुपयांनी वाढ झाली आहे. संस्थेकडे वर्ष अखेर 74 कोटी 45 लाख रुपयांच्या ठेवी असून कर्ज वितरण 42 कोटी 5 लाख रुपयांचे झाले आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष श्रीगोपाल धूत यांनी दिली.
संस्थेच्या संचालक मंडळाची सभा नुकतीच धूत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. संस्थेचे अंतर्गत लेखापरिक्षक एन.जे.लोहे अॅण्ड कंपनीचे सीए पुनित व्होरा यांनी 2020-2021 या आर्थिक वर्षाचा ताळेबंद सभेसमोर सादर केला. सभेला अध्यक्ष धूत यांच्यासह उपाध्यक्ष विश्वनाथ कासट तसेच संचालक राजेंद्र गुजराथी, प्रकाश गांधी, लक्ष्मीकांत झंवर, जगदीशप्रसाद दरक, ओमप्रकाश चांडक, गोपाल मणियार, राजेंद्र मालू, मधुसूदन सारडा, अॅड.अशोक बंग,राजेंद्रकुमार कंत्रोड, अनुरिता झगडे, देवराव साठे तसेच व्यवस्थापक शशिकांत पुंडलिक, कुमार आपटे उपस्थित होते. संस्थेने इतर बँकेत 71 कोटी 7 लाख रुपयांची सुरक्षित गुंतवणूक केली आहे. राखीव व इतर निधी 24 कोटी 58 लाख रुपये आहे. संस्थेचा नेट एनपीए शून्य आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. लॉकडाऊनच्या बिकट परिस्थितीतही सभासद व ठेवीदार व कर्जदार यांच्या सहकार्यामुळेच संस्थेला भरीव कार्य करता आले. करोना काळात संस्थेने सामाजिक बांधिलकी जपत विविध ठिकाणी मदत केली आहे, असेही अध्यक्ष धुत यांनी सांगितले.
COMMENTS