Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया 1 मार्चपासून

20 हजार 638 संस्थांच्या निवडणुका प्रस्तावित

मुंबई : कोरोना महामारी आणि इतर नैसर्गिक आपत्तींमुळे प्रलंबित राहिलेल्या सर्व प्रकारच्या  सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार असून निवडणूक प्रक्रिया

धनी मला ही दाखवा ना विठूरायाची पंढरी !
माहूरच्या रेणुकादेवी मंदिरातील तांबुलला ‘जीआय टॅग’, 3 ते 4 महिन्यांत प्रमाणपत्र मिळणार
करमाळ्याचे आमदार यांनी शेतकऱ्यांच्या उताऱ्यावर काढलेले कोट्यवधी कर्ज l पहा LokNews24

मुंबई : कोरोना महामारी आणि इतर नैसर्गिक आपत्तींमुळे प्रलंबित राहिलेल्या सर्व प्रकारच्या  सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार असून निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश जिल्हा सहकारी निवडणूक अधिकार्‍यांना देण्यात आलेले आहेत. या आदेशानुसार 1 एप्रिल 2021 ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीत निवडणुकीस पात्र अ, ब, क व ड वर्गातील एकूण 20 हजार 638 सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया 1 मार्चपासून सुरू होणार आहेत, अशी माहिती सचिव, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, पुणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

या प्रसिद्धीपत्रकात नमूद केल्याप्रमाणे सहकारी संस्थांच्या निवडणुका पूर्व पदावर आणण्यासाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने 15 फेब्रुवारी 2023 रोजीच्या आदेशानुसार 01 एप्रिल 2021 ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीतील निवडणुकीस पात्र सर्व प्रकारच्या सहकारी संस्था (कृषि पतसंस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्था वगळता) यांच्या निवडणूक प्रक्रिया 01 मार्च 2023 पासून सुरू करण्याबाबत जिल्हा सहकारी निवडणूक अधिकार्‍यांना आदेश देण्यात आलेले आहेत. या संस्थांच्या निवडणुकांसाठी 01 फेब्रुवारी 2023 या अर्हता दिनांकावर प्रारूप मतदार याद्या तयार करण्यात येणार आहेत.  ज्या सहकारी संस्था निवडणुकीकरीता प्रारूप मतदार यादी सादर करणार नाहीत किंवा पुरेसा निवडणूक निधी उपलब्ध करणार नाहीत अशा संस्थांवर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960, नियम 1961 व महाराष्ट्र सहकारी संस्था (समितीची निवडणूक) नियम 2014 अंतर्गत कारवाई करण्याबाबतचे आदेश देखील जिल्हा सहकारी निवडणूक अधिकार्‍यांना  देण्यात आलेले आहेत. या आदेशानुसार अ, ब, क व ड वर्गातील अनुक्रमे 63, 1014, 10163 व 9398 अशा एकूण 20 हजार 638 सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया सुरु झाल्या आहेत. अ वर्ग संस्थांमध्ये प्रामुख्याने 28 सहकारी साखर कारखाने, 3 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, 26 सहकारी सुतगिरण्यांचा समावेश आहे, अशी माहिती राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव डॉ. पी. एल. खंडागळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

COMMENTS