Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतकर्‍यांवर बंदूक रोखणारे सरकार खाली खेचणार

उद्धव ठाकरेंचा अकोले येथील सभेत इशारा

अकोले ः शेतकर्‍यांचे अश्रू पुसण्याऐवजी शेतकर्‍यांवर अश्रू धूर सोडणारे व शेतकर्‍यांवर बंदुक रोखणारे नादान सरकार आता खाली खेचावे लागेल असा इशारा शि

राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार ?
राज्यात गँगवार करणारे सत्तेत नको
ठाकरे गटाला धक्का

अकोले ः शेतकर्‍यांचे अश्रू पुसण्याऐवजी शेतकर्‍यांवर अश्रू धूर सोडणारे व शेतकर्‍यांवर बंदुक रोखणारे नादान सरकार आता खाली खेचावे लागेल असा इशारा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. ते अकोले येथे जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने आले असता जाहीर सभेत बोलत होते. सरकार आपल्या दारी नाही तर सरकार भांडवलदारांच्या दारी  असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी सरकारवर केली.

ते पुढे म्हणाले की, माझ्याकडे जिवंत आणि लढाऊ मावळे आहेत, तर त्यांच्याकडे गद्दार आणि खोके आहेत. केंद्रात  सरकार अश्रू धुरांच्या वापर शेतकर्‍यांवर करत आहेत शेतकर्‍यांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यापेक्षा ऐवजी अश्रू धुर सोडत आहे. दिल्लीत येण्यापासून रोखत आहे. आंदोलक शेतकर्‍यांना भेटण्यास केंद्र सरकार का घाबरते, असा सवाल त्यांनी केला. मी मुख्यमंत्री असताना सर्व काही शेतकर्‍यांसाठी केले. कर्जमाफी केली यांनी अच्छे दिनाचे स्वप्न दाखवले ते कुठे गेले अच्छे दिनाच्या स्वप्नावर निवडून आले. यापुढे राज्यात येणारे सरकार हे शिवसेनेचे असेल असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रात यापुढे येणारी सरकार सेनेचे असे असेल गद्दारांना मंत्री पद आणि खोके दिली जातात तर शेतकर्‍यांना काहीच नाही असा खोचक टोला लगावत त्यांनी राज्य सरकारवर  प्रखर टीका केली. फडणवीस हे दुसर्‍याची घर फोडणारे फोडणवीस आहे अशी टीका करत ते म्हणाले की महाराष्ट्रातील हे सरकार घटनाबाह्य आहे त्यांच्या कार्यक्रमात खुर्च्या खुर्च्या रिकाम्या असतात तर आमच्याकडे तळपत्या उन्हात देखील सच्चा कार्यकर्त्यांची गर्दी असते ही पोटदुखी त्यांना सहन होत नाही. उद्धव ठाकरे कधी संपेल याची वाट पाहत आहे उद्धव ठाकरे कधीही एकटा नाही उभ्या  महाराष्ट्रातील तमाम जनता आमच्या सोबत असल्याचे येणारे सरकार आमचे असेल असे ते म्हणाले. खासदार संजय  राऊत म्हणाले की आमचे चिन्ह आणि पक्ष चोरून नेले पण आमच्या सोबत जनतेची ताकद आहे मोदींमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी र्शाीं  मशीन ऐवजी मतपत्रिकेवर  निवडणुका घेऊन दाखवा असा असा इशारा त्यांनी दिला. या प्रसंगी शिर्डी लोकसभेचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, जिल्हा बँकेचे संचालक अमित भांगरे, मधुकर तळपाडे, शुभांगी पाटील मच्छीन्द्र धुमाळ,महेश नवले, प्रदीप हासे, मधुकर दराडे, संतोष मुतडक, राहुल लांडे यांची भाषणे झाली. यावेळी व्यासपीठावर नेवाशाचे आमदार  शंकरराव  गडाख, अगस्तीच्या कारखान्याच्या उपाध्यक्ष  सुनीता  भांगरे सतीश भांगरे  संदीप कडलग  बाळासाहेब नाईकवाडी  मींनानाथ पांडे  सुरेश गडाख आदी  मान्यवर उपस्थित होते. यावेळी मोठया संख्येने नागरिकांची उपस्थिती होती. उद्धव ठाकरे यांचे अकोल्यात एन्ट्री होताच पुष्पवृष्टी करत जल्लोषात स्वागत करण्यात आले.

COMMENTS