शेतकरी आंदोलनात सहभागी झाल्याने धुळे जिल्ह्यातील कॉ. काकुस्ते यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतकरी आंदोलनात सहभागी झाल्याने धुळे जिल्ह्यातील कॉ. काकुस्ते यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध

अहमदनगर (प्रतिनिधी)-  लखीमपूर येथील शेतकरी हत्याकांडाच्या निषेधार्थ अखिल भारतीय किसान सभा, संयुक्त किसान मोर्चा व भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने

खरवंडी कासार परिसरातील विविध प्रश्नाबाबत आंदोलन करणार – अंकुश कासुळे
अहमदनगर मध्ये एसटी चालकाची गळफास घेऊनआत्महत्या (Video)
जिल्हा लोकल रिट कोर्ट सत्याग्रह जारी

अहमदनगर (प्रतिनिधी)- 

लखीमपूर येथील शेतकरी हत्याकांडाच्या निषेधार्थ अखिल भारतीय किसान सभा, संयुक्त किसान मोर्चा व भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने करण्यात आली. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांना बडतर्फ करा, शेतकर्‍यांना चिरडणार्‍या मंत्रीपुत्रावर कलम 302 प्रमाणे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा व या हिंसाचारातील आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली. 

या आंदोलनात यावेळी भाकपचे राज्य सहसचिव अ‍ॅड.कॉ. सुभाष लांडे, राज्य किसान सभेचे राष्ट्रीय कौन्सिल सदस्य अ‍ॅड.कॉ. बन्सी सातपुते, भाकपचे जिल्हा सहसचिव अ‍ॅड.कॉ. सुधीर टोकेकर, कॉ.भैरवनाथ वाकळे, रामदास वागस्कर, युथ फेडरेशनचे शहराध्यक्ष फिरोज शेख, सतीश पवार, क्रांतिसिंह कामगार संघटनेचे बाळासाहेब सागडे, वैभव कदम, महिला फेडरेशनच्या सुलाबाई आदमाने, प्रशांत आरे, गंगाधर त्र्यंबके, जाहिद शेख, पंढरीनाथ मुदळ आदी सहभागी झाले होते.

लखीमपूर घटनेला भाजप सरकार कारणीभूत असल्याचा आरोप करत आंदोलकांनी भाजप विरोधी जोरदार घोषणा दिल्या. लखीमपूर येथील शेतकरी हत्याकांडाच्या विरोधात देशव्यापी निषेध सप्ताहाचा भाग म्हणून निदर्शने करण्यात आले. शेतकर्‍यांच्या हत्येचा, तीन कृषी कायद्यांचा व शेतीच्या उध्दवस्तीकरणाचा थेट परिणाम शेत मजुरांवर होत आहे. म्हणूनच दिल्ली येथे दहा महिन्यांपासून सुरू असलेल्या किसान आंदोलनात शेतमजुरांचा ही पाठिंबा आहे.

संयुक्त किसान मोर्चा, किसान सभा व भाकप पक्षाच्या वतीने या घटनेच्या निषेधार्थ देशव्यापी निषेध सप्ताह पाळण्यात येत असून, जिल्हाभरात शाखा-शाखांमध्ये आंदोलन सुरु राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

केंद्र सरकारने पारीत केलेले तीन कृषी कायदे तातडीने रद्द करावे, लखीमपूर हिंसाचाराची जबाबदारी स्विकारुन योगी सरकारने राजीनामा द्यावा, हिंसाचाराच्या घटनेत मुख्य आरोपी असलेल्या मंत्रीपुत्रावर कलम 302 प्रमाणे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा, केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांना बडतर्फ करावे, या प्रकरणातील सर्व आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपतींना पाठविण्यात आले आहे.

शेतकरी आंदोलनात सहभागी झाल्याने धुळे जिल्ह्यातील कॉ. काकुस्ते यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध

लाल निशाण पक्षाचे राज्य अध्यक्ष व श्रमिक शेतकरी संघटनेचे राज्य सरचिटणीस असलेले कॉ. सुभाष काकुस्ते यांच्यावर साक्री (जि. धुळे) येथे प्राणघातक हल्ला करण्यात आला. या घटनेचा यावेळी निषेध नोंदवून यामधील आरोपींना देखील अटक करण्याची मागणी करण्यात आली.

COMMENTS