शिवरायांचा लोककल्याणकारी आदर्श राज्यकारभार आम्हां सर्वांना प्रेरणा देतो – छगन भुजबळ

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवरायांचा लोककल्याणकारी आदर्श राज्यकारभार आम्हां सर्वांना प्रेरणा देतो – छगन भुजबळ

अठरापगड जातींच्या मावळ्यांना एकत्र करून हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे, लोककल्याणकारी, प्रजाहितदक्ष, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ६ जून रोजी साजरा केला जातो.

तहसीलदार देवरेंना न्याय मिळण्यासाठी सोमवारी काळ्या फिती लावून आंदोलन
ड्रायव्हरनं मालकाच्या घरातून केली चोरी
राहुरीत खासदार विखेंच्या हस्ते कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

 मुंबई/ नाशिक : अठरापगड जातींच्या मावळ्यांना एकत्र करून हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे, लोककल्याणकारी, प्रजाहितदक्ष, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ६ जून रोजी साजरा केला जातो. या शिवराज्याभिषेकदिनी राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करत जनतेला शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

या शुभसंदेशात छगन भुजबळ यांनी म्हटले आहे की, अठरापगड जातीच्या लोकांना एकत्र करत शिवरायांनी आदर्श लोककल्याणकारी राज्यकारभार केला तो आजही आम्हा सर्वांना प्रेरणा देतो. कोरोनाचे सावट असल्याने विविध ठिकाणी होणारे कार्यक्रम हे निवडक निमंत्रितांच्या उपस्थितीत पार पडत आहेत. ज्येष्ठ शुध्द त्रयोदशीला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. याच दिवशी महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्याची अधिकृतपणे घोषणा केली होती. अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा दरवर्षी ६ जून रोजी किल्ले रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

‘हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा’ या एकाच ध्यासाने संपूर्ण जीवन व्यापलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही महाराष्ट्राच्या इतिहासातील अत्यंत महत्वपूर्ण घटना आहे. त्यामुळे हा दिवस आपण सर्वजण सर्वत्र उत्साहात साजरा करत असतो यंदा मात्र कोरोनाचे सावट असल्याने जरी आपण टाळेबंदीचे निर्बंध शिथिल करत असलो तरी गर्दी न करता प्रत्येकाने शिवराज्याभिषेक दिनाचे कार्यक्रम घरगुती पद्धतीनेच करावे असे आवाहन देखील मंत्री भुजबळ यांनी जनतेला केले आहे. महाराष्ट्राचं आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, शेतकऱ्यांचे कैवारी, रयतेचे राजे, युगप्रवर्तक राजे अशी ओळख असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सदैव केवळ रयतेच्या सुखाचा विचार केला. त्यांनी दाखवलेल्या मार्गानेच आज आपण वाटचाल केली पाहिजे. त्यांच्या विचारांना आदर्श मानून त्यांचा लोककल्याणकारी राज्यकारभार समोर ठेऊनच हा महाराष्ट्र वाटचाल करील असा विश्वास व्यक्त करतानाच शिवराज्याभिषेक दिनी महाराष्ट्रातील तमाम जनतेला मंत्री छगन भुजबळ यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

COMMENTS