शिंगणापूरात व्यावसायिकांची केली कोरोना तपासणी

Homeमहाराष्ट्रअहमदनगर

शिंगणापूरात व्यावसायिकांची केली कोरोना तपासणी

कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी शिंगणापूर येथे सर्व प्रकारच्या किराणा दुकानदार, भाजीपाला विक्रेते, मेडिकल विक्रेते  ,बँक कर्मचारी, कॉल सेंटर कर्मचारी तसेच इतर अत्यावश्यक सेवेतील  व्यावसायीकाची शिंगणापूर ग्रामपंचायत  व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या साह्याने वैद्यकीय पथकांकडून कोरोना तपासणी करण्यात आली असल्याची माहिती सरपंच सौ सुनीता भीमराव संवत्सरकर यांनी दिली.

नगर अर्बनच्या आजी-माजी संचालकांना अजामीनपात्र वॉरंट
सरकारी कर्मचारी दुसर्‍या दिवशीही संपावर
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावावा  

कोपरगाव शहर प्रतिनिधी: कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी शिंगणापूर येथे सर्व प्रकारच्या किराणा दुकानदार, भाजीपाला विक्रेते, मेडिकल विक्रेते  ,बँक कर्मचारी, कॉल सेंटर कर्मचारी तसेच इतर अत्यावश्यक सेवेतील  व्यावसायीकाची शिंगणापूर ग्रामपंचायत  व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या साह्याने वैद्यकीय पथकांकडून कोरोना तपासणी करण्यात आली असल्याची माहिती सरपंच सौ सुनीता भीमराव संवत्सरकर यांनी दिली.
   या वेळी सौ संवत्सकर यांनी सांगितले की,  कोपरगाव तालुक्यात कोरोनाचा धोका मागच्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात वाढत होता त्यामुळे आरोग्य यंत्रणेसह प्रशासन कोरोना संक्रमण रोखण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहे. आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका , शिक्षक घरोघरी जाऊन चौकशी करण्यासह आजारी रुग्णांना तात्काळ उपचार घेण्यासाठी  प्रयत्न करीत आहेत. सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांसह प्रशासकीय अधिकारी देखील संक्रमण थोपविण्यासाठी परिश्रम घेत आहे. ग्रामीण भागातील रुग्णसंख्येतील वाढ कमी करण्यासाठी गावातील सर्व व्यावसायिक व विविध अस्थापणाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांची  तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या आदेशानुसार व गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी  यांच्या सहकार्याने तसेच अहमदनगर जिल्हा बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली शिंगणापूर ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्र शिंगणापूर च्या वतीने कोरोना तपासणी घेण्यात आली यात एकूण १०६  लोकांची कोरोना टेस्ट करण्यात आली त्यात एक रुग्ण कोरोना बाधित आढळून आला तर ८७ लोकांचे घशातील स्राव पुढील तपासणीसाठी नगर येथे पाठवण्यात आले असल्याची माहिती सरपंच सौ संवत्सरकर यांनी दिली. 
या कोरोना आरोग्य तपासणी शिबिरास तालूका वैद्यकीय अधिकारी डॉ संतोष विधाते व शहर पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी भेट देत शिंगणापूर ग्रामपंचायत व आरोग्य कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.यावेळी     सरपंच सौ. सुनिता भीमराव संवत्सरकर, कामगार पोलीस पाटील सौ. सविता प्रशांत आढाव व ग्रामविकास अधिकारी जगन्नाथ शिंदे, समस्त शिंगणापूर ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी पवन गिते, कुणाल संवत्सरकर, सुरज आजगे, आरोग्य सेविका वंदना धनवटे,  आरोग्य सेवक सुभाष महाजन, संजय चौधरी, आशा सेविका नीता भोसले, वैशाली उंडे, लॅब टेक्निशियन आकाश आरने आदींनी कोरोना तपासणी मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.

COMMENTS