नगरच्या वकिलाला दिला राजकारणातील शिवाजी पुरस्कार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगरच्या वकिलाला दिला राजकारणातील शिवाजी पुरस्कार

अहमदनगर/प्रतिनिधी : भारतीय वायु सेनेचे निवृत्त अधिकारी व सैनिक समाज पार्टीचे राज्याध्यक्ष अ‍ॅड. शिवाजी डमाळे यांना जवान फाउंडेशनच्या वतीने राजकारणाती

“मी आठ दिवसात परत नगरला येणार, क्रीडापटूंचे प्रश्न मी मार्गी लावून देतो – ना. सुनील केदार
यंदा जायकवाडी धरणामध्ये पाण्याची मोठी तूट – इंजि. चकोर
चेतन पिपाडा बनले कमर्शियल पायलट

अहमदनगर/प्रतिनिधी : भारतीय वायु सेनेचे निवृत्त अधिकारी व सैनिक समाज पार्टीचे राज्याध्यक्ष अ‍ॅड. शिवाजी डमाळे यांना जवान फाउंडेशनच्या वतीने राजकारणातील शिवाजी या पुरस्काराने गौरविण्यात आले. राजकारणासह समाजकारणात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना हा आगळावेगळा पुरस्कार देण्यात आला आहे. जळगाव येथे झालेल्या सोहळ्यात डमाळे यांना जवान फाउंडेशनचे अध्यक्ष ईश्‍वर मोरे व ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. यावेळी कर्नल नायडू, सुनीताताई झिंजुर्डे उपस्थित होते.
अ‍ॅड. डमाळे यांचे राजकारणातील प्रस्थापितांची घराणेशाही मोडून काढण्यासाठी व भ्रष्टाचार संपविण्यासाठी पक्षाच्या माध्यमातून कार्य सुरु आहे. देशभक्तीच्या विचारधारेने ते समाजातील प्रश्‍न सोडवत असून, वंचितांना आधार व न्याय मिळवून देण्यासाठी योगदान देत आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना राजकारणातील शिवाजी हा पुरस्कार देण्यात आला आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे. शिवाय राजकारणातील शिवाजी हे पुरस्काराचे आगळेवेगळे नावही चर्चेचे झाले आहे.

COMMENTS