वाळकी गटात कोट्यवधींची विकासकामे मार्गी लावण्यात यशस्वी : बाळासाहेब हराळ

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वाळकी गटात कोट्यवधींची विकासकामे मार्गी लावण्यात यशस्वी : बाळासाहेब हराळ

नगर : जनतेने दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. वाळकी गटात कोट्यवधीची विकासकामे मार्गी लावण्यात यश आलेले असून निधीच

Parner : पारनेरला तहसीलदार देवरेंनी केला सहा कोटीचा भ्रष्टाचार? : लोकायुक्तांकडे तक्रार l LokNews24
नगरच्या उड्डाण पुलाचे काम अंतिम टप्प्याच्या दिशेने ; खांबांवर सिमेंट प्लेटा टाकल्या जाणार, सहा महिने चालणार काम
माऊलीच्या मदतीने तिला मिळतंय आयुष्याचं दान…

नगर :

जनतेने दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. वाळकी गटात कोट्यवधीची विकासकामे मार्गी लावण्यात यश आलेले असून निधीची कमतरता भासू दिलेली नाही. जलयुक्त शिवारसह सामाजिक वनीकरण, नदी खोलीकरण, बंधारे दुरुस्ती अशा कामांमुळे गावं तालुक्यात आदर्श गाव योजनेच्या नकाशावर आली आहे. जनतेचा विश्वासाला कधीही तडा जावू देणार नाही, अशी ग्वाही माजी जि.प.सदस्य बाळासाहेब हराळ यांनी दिली.
नगर तालुक्यातील हिवरेझरे येथील नूतन ग्राम सचिवालयाचे उद्घाटन नुकतेच जि.प.उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके यांच्या हस्ते झाले. यावेळी बाळासाहेब हराळ, पं.स.सभापती सुरेखा गुंड, जि.प.सदस्य संदेश कार्ले, गोविंद मोकाटे, आबासाहेब सोनवणे, डॉ.दिलीप पवार, संतोष लगड, नगरसेवक योगीराज गाडे,ह.भ.प. झेंडे महाराज, रघुनाथ झिने, सरपंच ऍड.अनुजा काटे, सुरेश काटे, नारायण रोडे, रोहिदास उदमले, दत्ता काळे, चांद शेख आदी उपस्थित होते.
विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांच्या निधीतून 15 लाख रुपये ग्राम सचिवालयासाठी उपलब्ध झाले. याशिवाय जिल्हा परिषद निधीतून 10 लाख, शाळा खोल्या दुरुस्तीसाठी 5 लाख रुपये, काळे वाडी रस्त्यासाठी 20 लाख रुपये, दलित वस्ती सुधार निधीतून 7 लाखांचे रस्ता कॉंक्रिटीकरण अशा कामांचे लोकार्पण यावेळी करण्यात आले.
प्रताप शेळके म्हणाले की, नगर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकासगंगा आणण्याचे काम सुरु केले आहे. हराळ यांच्यासारखे सदस्य विकासकामांसाठी सातत्याने पाठपुरावा करून निधी मिळवतात. त्यामुळे अनेक गावांमध्ये कायापालट होत असल्याचे पहायला मिळत आहे. सर्वसामान्यांना केंद्रस्थानी ठेवून विकासकामे करीत असल्याचे शेळके यांनी सांगितले. शेवटी चांद शेख यांनी आभार मानले. कार्यक्रमास ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS