लहान मुलांवर कोरोना लसीची बारामतीत चाचणी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लहान मुलांवर कोरोना लसीची बारामतीत चाचणी

प्रौढांपाठोपाठ किशोरवयीन मुलांचे लसीकरण करण्याची गरज निर्माण झाली आहे. कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक असल्याची चर्चा आहे.

ढगाळ वातावरणामुळे गहु काढणीला वेग
आत्मकेंद्री लोकशाहीमुळे अनागोंदी व भ्रष्टाचार पोसला गेल्याचा आरोप
आई राजा उदे उदेच्या गजराने राशीन, कुळधरण दुमदुमले !

बारामती/प्रतिनिधी: प्रौढांपाठोपाठ किशोरवयीन मुलांचे लसीकरण करण्याची गरज निर्माण झाली आहे. कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक असल्याची चर्चा आहे. या पार्श्‍वभूमीवर लसीकरणाच्या दृष्टीने आता देशभरात चाचण्या सुरू झाल्या आहेत. बारामती शहरातील खासगी रुग्णालयाची या चाचण्यांसाठी निवड करण्यात आली आहे. बारामतीत तिसर्‍या टप्प्यातील लसीची चाचणी केली जाणार आहे. येथील डॉक्टरांवर याबाबत प्रमुख जबाबदारी देण्यात आली आहे. 

शहरातील बारामती हॉस्पिटलमध्येही शंभर ते दीडशे मुलांवर या चाचण्या केल्या जाणार आहेत. 28 दिवसांच्या कालमयार्देत या मुलांना तीन डोस देण्यात येणार आहेत. त्यानंतर या मुलांमध्ये होणार्‍या परिणामांचे आरोग्य निरीक्षण नोंदविले जाणार आहे. तसेच या लसीच्या परिणामांचा अभ्यासदेखील केला जाणार आहे. लसीकरण करण्यापूर्वी या मुलांच्या आरटीपीसीआर तपासणी तसेच त्यांच्यातील अँटी बॉडीजच्या तपासण्याही केल्या जाणार आहेत. बारामतीतील बालरोगतज्ज्ञ डॉ. भास्कर जेधे हे या प्रक्रियेमध्ये प्रिन्सिपल इनव्हेस्टीगेटर म्हणून कार्यरत असतील. एका कंपनीच्या लसीची ही चाचणी होणार आहे. मुलांमध्ये लस देण्यापूर्वी व नंतरचे बदल याबाबतचे निरीक्षण बारकाईने नोंदविले जाणार आहे. बारामती शहरात 12 ते 18 वर्षे वयोगटाच्या मुलांच्या लसीकरणाच्या चाचण्या होणार आहे. त्यानंतर या मुलांच्या लसीकरणाबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. संभाव्य तिसरी लाट व लहान मुलांना होणारा धोक्याच्या चर्चा पाहता पालकांना या लसीची मोठी प्रतीक्षा आहे.

COMMENTS