रेखा जरे यांची हत्या प्रेमसंबंधांतून ; हत्येनंतर अर्ध्या तासात पैसे झाले मारेकर्‍यांना पोहोच

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रेखा जरे यांची हत्या प्रेमसंबंधांतून ; हत्येनंतर अर्ध्या तासात पैसे झाले मारेकर्‍यांना पोहोच

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांना दैनिक सकाळचा कार्यकारी संपादक बाळ बोठे याच्यावर असलेल्या प्रेमाची किंमत स्वतःचे प्राण देऊन मोजावी लागली आहे.

सीमाभागातील मराठी भाषिकांवरील अन्याय थांबवा : अजित पवार l DAINIK LOKMNTHAN
रेमडीसीवीर-ऑक्सिजनचा पुन्हा तुटवडा…रुग्णांसह प्रशासनही चिंतेत..
बंदी असलेल्या सुगंधी तंबाखू साठ्यावर कोतवाली पोलिसांची धाडसी कारवाई

अहमदनगर/प्रतिनिधी-यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांना दैनिक सकाळचा कार्यकारी संपादक बाळ बोठे याच्यावर असलेल्या प्रेमाची किंमत स्वतःचे प्राण देऊन मोजावी लागली आहे. बोठेशी त्यांचे तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते व त्यामुळे काही कारणाने त्यांच्यात वादावादीही होत असे. मात्र, यामुळे आपली बदनामी होईल, या भीतीने बोठेने याने मारेकर्‍यांद्वारे जरे यांची हत्या करवली व जरे यांची हत्या झाल्याचे स्पष्ट झाल्यावर अर्ध्या तासात मारेकर्‍यांना 12 लाख रुपये पोहोचही केले. 

    थंड डोक्याने व नियोजनबद्धरितीने बोठेने जरे यांना संपवले आहे व हा त्याचा कारनामा पोलिसांनी त्याच्याविरुद्ध दाखल केलेल्या पुरवणी दोषारोप पत्रातून स्पष्ट झाला आहे. बोठे याने जरे यांच्या हत्येची सुपारी 12 लाखाची दिली होती. त्यानंतर जातेगाव घा़टात 30 नोव्हेंबरच्या रात्री आठच्या सुमारास चाकूचा गळ्यावर वार करून जरे यांची हत्या झाल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात बोठेकडून मारेकर्‍यांना 12 लाख रुपये पोहोच झाले आणि त्यांच्याशी ठरलेल्या सुपारीचा व्यवहारही पूर्ण झाल्यावर बोठे जिल्हा शासकीय रुग्णालयात जरेंचे पार्थिव पाहण्यास तसेच त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यास गेल्याचे पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोपपत्रातून स्पष्ट झाले आहे. 450 पानांच्या या दोषारोप पत्रात जरे यांच्या हत्येचे कारणही स्पष्ट करण्यात आले आहे. रेखा जरे व बाळ बोठे यांच्यात प्रेमसंबंध होते व त्यातून त्यांच्यात वादावादी होत होती. मात्र, यामुळे बदनामी होईल या भीतीने बोठेने जरे यांना संपवण्याची सुपारी सागर भिंगारदिवे याला दिली होती. त्याने ती आदित्य चोळके याला व त्याने ज्ञानेश्‍वर शिंदे व फिरोज शेख यांना ती दिली होती.

लगेच पूर्ण झाला व्यवहार

30 नोव्हेंबरला जरे यांची हत्या शिंदे व शेख यांनी केल्यावर अर्ध्या तासातच बोठेने भिंगारदिवे याला 12 लाख रुपये दिले व तो जिल्हा शासकीय रुग्णालयाकडे निघून गेला तर भिंगारदिवेने लगेच चोळकेला बोलावून घेऊन त्याला साडेतीन लाख रुपये दिले व बाकी पैसे घेऊन तो घरी गेला. घरी यातील काही पैसे ठेवून तो लगेच कोल्हापूरला निघून गेला. इकडे चोळकेने त्याला मिळालेल्या साडेतीन लाखापैकी प्रत्येकी 50-50 हजार रुपये शिंदे व शेख यांना दिले. यावरून अत्यंत थंड डोक्याने व निर्घृणपणे रेखा जरे यांची हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. नगर ग्रामीण विभागाचे उपविभागीय अधिकारी पोलिस उपअधीक्षक अजित पाटील यांनी रेखा जरे यांच्या हत्याकांडाचा तपास केला आहे व त्यांनीच मंगळवारी पारनेर न्यायालयात बोठे विरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल केले आहे.

26 जणांचे आहेत जबाब

पारनेर न्यायालयामध्ये बोठे याच्यासह सात जणांवर दोषारोप पत्र दाखल झाले असून, यात 26 जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. त्यात शुभम गायकवाड, राजेश परकाळे, डॉ. मकासरे यांच्यासह अन्य काही जणांचा समावेश आहे. खुनाच्या घटनेचा सर्व उलगडा आरोपी बोठेकडून घेऊन त्यामध्ये त्याचे झालेले इतरांशी संभाषण तसेच आरोपींशी झालेली डील यासह सर्वाचा गोषवारा यामध्ये आलेला आहे.

COMMENTS