रायगडमध्ये उभारणार आदिवासी बहुउद्देशीय संकुल

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रायगडमध्ये उभारणार आदिवासी बहुउद्देशीय संकुल

राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती सुनिल तटकरे यांच्या पुढाकारातून तसेच सातत्यपूर्ण प्रयत्नातून जिल्ह्यातील सुधागड-पाली तालुक्यातील मौजे जांभूळपाडा येथे आदिम जमाती (कातकरी) यांच्याकरिता बहुद्देशीय संकुल उभारण्यासाठी शासनाने नुकतीच मान्यता दिली आहे.

बॅगमध्ये आढळला 2 वर्षाच्या चिमुरडीचा मृतदेह
कोपरगावात डॉ. आंबेडकरांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी
ईडीचे महाराष्ट्र-गुजरातमध्ये 24 ठिकाणी छापे

अलिबाग : राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती सुनिल तटकरे यांच्या पुढाकारातून तसेच सातत्यपूर्ण प्रयत्नातून जिल्ह्यातील सुधागड-पाली तालुक्यातील मौजे जांभूळपाडा येथे आदिम जमाती (कातकरी) यांच्याकरिता बहुद्देशीय संकुल उभारण्यासाठी शासनाने नुकतीच मान्यता दिली आहे. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे कु. आदिती तटकरे यांनी केलेल्या मागणीच्या अनुषंगाने अर्थसंकल्पात तशी घोषणा करण्यात आली होती. या प्रकल्पाकरीता मौजे जांभूळपाडा ता. सुधागड येथे स.नं.106 क्षेत्र 19-75-00 हे.आर एवढी शासकीय जमीन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्याकडे हस्तांतरीत करण्यात येणार आहे. आदिवासी जमातीची कुटुंबे अतिदुर्गम व अविकसित अशा सीमाभागात राहत असल्यामुळे या कुटूंबांना जीवनावश्यक सोयी-सुविधा उपलब्ध होणे कठीण असते. या प्रकल्पामुळे त्यांच्या मुलांना योग्य शिक्षण, आरोग्य तपासणी व उपचार, दैनंदिन आवश्यक अन्न किंवा वापर वस्तूंचा पुरवठा, मनोरंजन व करमणूक आणि त्यांच्या उपजीविकेवर आधारित व्यवस्था एकाच ठिकाणी उपलब्ध होणार असून आदिवासी समाजाच्या प्रगतीस यामुळे चालना मिळणार आहे.

COMMENTS