Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यातील वाहतूक कोंडीत अडकली रुग्णवाहिका

पुणे ः  पुणेकरांना वाहतुकीच्या समस्येला मोठ्या प्रमाणावर तोंड द्यावे लागत असतांना, सोमवारी याच वाहतूक कोंडीमुळे एक रुग्णवाहिका अडकून पडली होती. र

परतीच्या पावसाने हेळगावसह कालगाव परिसरास झोडपले
वंचितांना ऊबदार ब्लँकेट, कपडे व फराळचे वाटप
भाजपचा देवेंद्र फडणवीस यांना धक्का

पुणे ः  पुणेकरांना वाहतुकीच्या समस्येला मोठ्या प्रमाणावर तोंड द्यावे लागत असतांना, सोमवारी याच वाहतूक कोंडीमुळे एक रुग्णवाहिका अडकून पडली होती. रुग्णवाहिका वेळेवर रुग्नालयात पोहचणे गरजेचे आहे. मात्र अशा ट्राफीकमध्ये अडकल्याने एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाल्यास जबाबदार कोण असा प्रश्‍न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
सोमवारी दुपारी 12 च्या सुमारास औंधकडून पुणे विद्यापीठ चौकाकडे येणार्‍या रस्त्यावर वाहनांची प्रचंड गर्दी झाली. याच वाहतूक कोंडीत गंभीर रुग्णाला घेऊन जाणारी रुग्णवाहिका अडकली. सर्वसामान्यांना कितीही तळमळीने रुग्णवाहिकेला वाट करून देण्याची इच्छा होत असली तरी ते शक्य झाले नाही. कारण रस्त्यावर वाहनांची प्रचंड गर्दी असल्याने गाड्या बाजूला घेऊन रुग्णवाहिकेला वाट करून देणे शक्य नव्हते. या सगळ्यात पुणे पोलिसांच्या वाहतुकीच्या नियोजनचा अभाव असल्याचे कारण समोर येत आहे. पुणे वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई क्टिव्ह पणे केली जाते मात्र वाहतूक कोंडी होऊनये यासाठी रस्त्यावर उभे ठाकून वाहतूक कोंडीचे नियोजन करण्यात पुणे वाहतूक पोलिसांचा सुस्तावलेपणा दिसतोय. या वाहतूक कोंडीमुळे जर कोणाचा जीव गेला तर याला जबाबदार कोण? असा प्रश्‍न संतप्त नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर देखील सातत्याने वाहतूक कोंडीच्या समस्येला तोंड द्यावे लागते. शनविरी रात्री देखील पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. शनिवारी सकाळपासूनच सुरू झालेली वाहतूक कोंडी रात्री देखील अवजड वाहनांमुळे वाहतूक धीम्या गतीने सुरू होती. त्यातच काल रविवारचा दिवस असल्याने अनेक पर्यटक हे लोणावळा महाबळेश्‍वर, कोल्हापूर, आणि अन्य ठिकाणी पर्यटनासाठी निघाले होते. त्यामुळे आणखीनच वाहतूक कोंडी वाढली होती.

COMMENTS