राज्यात पाऊस सक्रिय ; उद्यापासून वाढणार जोर

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात पाऊस सक्रिय ; उद्यापासून वाढणार जोर

मोसमी पाऊस कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुन्हा सक्रियपुणे/प्रतिनिधी : राज्यात अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे बळीराजा चिंतित होता. मात्र गुरूवा

शेतकर्‍यांवर संकटांचा डोंगर
इस्लामपूर पालिकेची 3 जानेवारीची सभा रद्द
वजीराबाद पोलिसाकडून गुन्हा नोंदविण्यासाठी टाळाटाळ

मोसमी पाऊस कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुन्हा सक्रिय
पुणे/प्रतिनिधी : राज्यात अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे बळीराजा चिंतित होता. मात्र गुरूवारपासून राज्यातील विविध जिल्ह्यात पावसाच्या आगमनाला सुरूवात झाल्यामुळे बळीराजा आनंदित झाला आहे. उद्या शनिवारपासून मुंबई, पुण्यासह विविध जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
अरबी समुद्रातून मोसमी पावसाला पोषक स्थिती निर्माण झाल्याने तसेच बंगालच्या उपसागरातून कमी उंचीवरून जमिनीच्या दिशेने बाष्प येत असल्याने गुरुवारपासून (8 जुलै) कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय झाल्यामुळे राज्यात पेरण्यांना वेग येणार आहे. गेल्या 8-10 दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे पेरण्या रखडल्या होत्या. तर अनेक ठिकाणी पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र पावसाअभावी शेतकर्‍यांना दुबार पेरणीला सामौरे जावे लागू शकते. राज्यात गुरूवारी अहमदनगर, मुंबई, ठाण्यासह कोकण विभाग, पुणे, कोल्हापूर, सातार्‍यासह मध्य महाराष्ट्र, विदर्भातील नागूपर, वर्धा आणि मराठवाडयातील काही भागांत पावसानेे जोरदार हजेरी लावली. पावसाच्या सक्रियतेनंतर पाण्यासाठी आणि दुबार पेरणीचे संकट दूर होऊ शकणार आहे. राज्याच्या सर्वच भागांमध्ये गेल्या दहा ते बारा दिवसांपासून मोसमी पावसाने दडी मारली होती. जूनच्या अखेरच्या टप्प्यात खरिपाच्या पेरण्या झालेला शेतकरीही दुबार पेरणीच्या संकटाच्या टांगत्या तलवारीमुळे चिंतेत आहे. पाऊस पुन्हा सक्रिय होणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिल्यामुळे काही प्रमाणात दिलासा व्यक्त केला जातो आहे. हवामान खात्याच्या इशार्‍याप्रमाणेच गुरूवारी सकाळपासूनच मुंबई, ठाण्यामध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. पुण्यातही काही ठिकाणी पाऊस सुरु झाला. अरबी समुद्रात सध्या मोसमी पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे 8 किंवा 9 जुलैपासून कोकणात पावसाला सुरुवात होणार आहे. मध्य महाराष्ट्रापर्यंत त्याचा प्रभाव जाणवणार आहे. दुसर्‍या बाजूला बंगालच्या उपसागरातून कमी बाष्पाचा पुरवठा होत आहे. त्यानंतर 11 जुलैला कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाडयासह मध्य भारतात 9 जुलैपासून पाऊस होणार असून, 11 जुलैला त्याचा जोर वाढणार आहे.


उद्या आणि परवा अतिवृष्टीची शक्यता
उद्या शनिवारी मुंबई, ठाण्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा. पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांत तुरळक भागात मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर रविवारी 11 जुलै रोजी मुंबई, ठाण्यासह कोकण विभाग, मध्य महाराष्ट्रातील संबंधित विभागांमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस ते अतिवृष्टीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विदर्भातील नागपूर, वर्धा जिल्ह्यांत मुसळधार, तर मराठवाडयातही काही ठिकाणी पावसाचा जोर वाढणार.

COMMENTS