मंत्री नव्हे, पंतप्रधानच बदलण्याची गरज : नाना पटोले

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मंत्री नव्हे, पंतप्रधानच बदलण्याची गरज : नाना पटोले

नागपूर: केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये अनेक अपयशी मंत्र्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. मात्रडॉ. हर्षवर्धन यांचा केंद्रीय आरोग्य मंत्रीपदाचा

काही शिजतयं की केवळ चर्चाच!
Raut : नारायण राणे प्रकरणात अमित शहांची एंट्री : शिवसेनाही तयारीत… संजय राऊतांना मुंबई | LOK News24
प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गत महाराष्ट्रात २४ लाख लाभार्थ्यांची नोंद

नागपूर: केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये अनेक अपयशी मंत्र्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. मात्रडॉ. हर्षवर्धन यांचा केंद्रीय आरोग्य मंत्रीपदाचा राजीनामा घेण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच राजीनामा द्यायला हवा होता. मोदीच सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहेत, असा घणाघाती हल्ला नाना पटोले यांनी चढवला आहे.
इंधनदरवाढ व महागाईविरोधात काँग्रेसने 10 दिवस आंदोलनाचा धडाका सुरू केला आहे. गुरूवारी नागपूरमध्ये नाना पटोले यांच्या नेतृत्वात सायकल रॅली काढण्यात आली. यावेळी ते बोलत होते. मोदींच्या मंत्री मंडळातून चांगल्या मंत्र्यांना, काम करणार्‍या मंत्र्यांना डच्चू मिळाला आहे. भ्रष्ट मंत्र्यांना प्रमोशन देण्यात आले आहे. संजय धोत्रे हे चांगले काम करत होते. त्यांनाही मंत्रिमंडळातून काढले आहे. देशाला बरबाद करणार्‍यांना ठेवले आहे. ज्यांनी पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करणार नाही, असे सांगणार्‍या मंत्र्यांना मंत्रिमंडळात ठेवले असल्याची टीका पटोले यांनी केली.
उज्ज्वला गॅसच्या माध्यमातून देशातील गरिब जनतेच्या घरी मोफत गॅस देण्याच्या नावाखाली मोदींनी त्यांची फसवणूक केली आहे. गॅस कनेक्शन देऊन त्यांचे रॉकेल बंद केले आणि आता 850 रुपयांचे गॅस सिलिंडर घेणे या गरिब कुटुंबांना परवडत नाही. मोदी सरकार शेजारच्या नेपाळ, भुतान, बांग्लादेशाला पेट्रोल 30 रुपये लिटर व डिझेल 22 रुपये लिटरने देते आणि आपल्या नागरिकांना मात्र त्याच पेट्रोल डिझेलसाठी 100 रुपये मोजावे लागतात. मोदी सरकारने केलेल्या या कृत्रिम महागाईने वाहतुकीसह इतर वस्तुंचीही महागाई झाली आहे. सामान्य माणसाचे जगणे कठीण करुन ठेवल्याची टीका पटोले यांनी यावेळी केली.

‘खराब इंजिन होते, पण बदलले डब्बे’
केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन 43 मंत्र्यांचा राष्ट्रपती भवनमध्ये शपथविधी झाला. त्यावरुन, काँग्रेस नेते किर्ती आझाद यांनी मोदी सरकारवर टीका केली. ’खराब तर इंजिने होते, पण डब्बे बदलण्यात आले,’ असे म्हणत किर्ती आझाद यांनी मोदींना लक्ष्य करत बोचरी टीका केली आहे. बिहारचे नेते असलेल्या आझाद यांची 2015 मध्ये भाजपतून हाकलपट्टी करण्यात आली होती.

COMMENTS