राज्यात कृषी पर्यटन केंद्र सुरू

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात कृषी पर्यटन केंद्र सुरू

टाळेबंदीचे नियम शिथिल करताना राज्य सरकारने पर्यटनाला हिरवा कंदील दाखवला आहे. कृषी पर्यटन केंद्रे बंद होती.

काटवन खंडोबा रोड, गाझी नगर येथे मजबुतीकरण व डांबरीकरण झालेल्या रस्त्याचे लोकार्पण 
अमृतवाहिनीच्या एमबीएमधील विद्यार्थ्यांचे 100 टक्के प्लेसमेंट
मनसे नेते अविनाश जाधववर खंडणीचा गुन्हा

पुणे/प्रतिनिधीः टाळेबंदीचे नियम शिथिल करताना राज्य सरकारने पर्यटनाला हिरवा कंदील दाखवला आहे. कृषी पर्यटन केंद्रे बंद होती. ऊन्हाळ्याच्या सुट्ट्यांत पर्यटकांना केंद्रांमध्ये जाता आले नाही. पावसाळी पर्यटनासाठी अनेक पर्यटक खास कृषी पर्यटन केंद्रात राहायला जातात. त्यामुळे पर्यटनाच्या हंगामाच्या सुरुवातीला केंद्रांतील पर्यटन सुरू होणार आहेत. 

कोरोनाची रुग्णसंख्या अधिक असलेले भाग वगळता महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाची (एमटीडीसी) सर्व पर्यटन केंद्रे पर्यटकांसाठी खुली झाली आहेत. टाळेबंंदीनंतरचे पर्यटन कसे असावे, यासाठी सर्व रिसॉर्टमध्ये कर्मचार्‍यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. टाळेबंदीमुळे घरी बसून कंटाळलेल्या पर्यटकांना निसर्गाच्या सानिध्यात फिरण्याचा, राहण्याचा अनुभव देण्यासाठी महामंडळाने आपली सर्व पर्यटक निवासे सज्ज केली आहेत. तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या सहभागातून ’एमटीडीसी’च्या पाचशेहून अधिक कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. उपहारगृह, रिझॉर्ट आणि अनुषंगिक बाबींची; तसेच परिसराची काटेकारेपणे स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. तातडीची वैद्यकीय सुविधाही उपलब्ध केली आहे. रिसॉर्टमध्ये राज्य सरकारच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात येणार आहे. ’मंडळाच्या सर्व निवासस्थानांचे वेबसाईटवर ऑनलाइन बुकिंग सुरू करण्यात आले आहे. आगामी काळात पर्यटकांचा ओढा लक्षात घेऊन विशेष सवलती जाहीर केल्या आहेत. ही सर्व माहिती वेबसाइटवर उपलब्ध आहे; तसेच पर्यटकांना निसर्गाच्या सानिध्यात राहून काम करण्याची संधी मिळावी, यासाठी रिसॉर्टवर वाय फाय सुविधा उपलब्ध केली आहे,’ अशी माहिती महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी दिली. टाळेबंदीचे नियम शिथिल करताना कृषी पर्यटन केंद्रांनाही परवानगी मिळाली आहे. मार्च महिन्यापासून राज्यातील टाळेबंदीनंतरच्या पर्यटनाचे नियम आम्ही गेल्या वर्षीच निश्‍चित केले आहेत. प्रत्येक केंद्रापर्यंत ही नियमावली पोहोचलेली आहे. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेची काळजी घेऊन आदरातिथ्य करणार आहोत. सर्व कृषी पर्यटन केंद्रे प्रशस्त जागेत असल्याने सुरक्षित अंतर आणि इतर सर्व नियमांचे पालन होणार आहे,’ अशी माहिती महाराष्ट्र राज्य कृषी पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब बराटे यांनी दिली.

COMMENTS