रणजित पाटील यांचा अनावधानाने चुक घडल्याचा खुलासा:कुलगुरू डाँ.धवन

Homeमहाराष्ट्रमराठवाडा

रणजित पाटील यांचा अनावधानाने चुक घडल्याचा खुलासा:कुलगुरू डाँ.धवन

परभणी: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील तत्कालीन वादग्रस्त कुलसचिव रणजीत पाटील यांनी स्वतःच्या वेतनापोटी परस्पर केलेल्या व उचललेल्या लाखो रुप

दोन तासाच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान (Video)
भाजपला मोठा झटका… सभापतींसह १३ संचालक जाणार शिवसेनेत
Parbhani : मॉर्निंग वॉक करणाऱ्या चार नागरिकांना ट्रकने चिरडले…

परभणी: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील तत्कालीन वादग्रस्त कुलसचिव रणजीत पाटील यांनी स्वतःच्या वेतनापोटी परस्पर केलेल्या व उचललेल्या लाखो रुपयांच्या प्रकरणाच्या खुलासापत्रात ती चूक अनावधानाने घडली असल्याचे मत व्यक्त केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.
कृषी विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य लिंबाजीराव भोसले यांचा तक्रार अर्ज प्राप्त झाला तेव्हा आपण त्या तक्रारीची चौकशी सुरू केली तेव्हा त्यात तथ्थ आढळून आले असे कुलगुरू डॉ. अशोक धवन यांनी  राज्याच्या गृहनिर्माण विभागाच्या प्रधान सचिवांना पाठवलेल्या एका पत्राद्वारे म्हटल्याची खात्रीलायक माहिती हाती आहे. . या पत्रात डाँ.धवन यांनी या गोष्टींचा खुलासा करतेवेळी काही बाबी स्पष्ट केल्या.त्यात
दोन जून 2019 रोजी नुसार स्पष्टीकरण विचारण्यात आले.त्यानुसार पाटील यांनी आपल्या कार्यालयाने  लेखी पत्राद्वारे विचारणा केली त्यावेळी  4 जून 2021 रोजी सादर केलेल्या खुलाश्यात मूळ विषयाला पद्धतशीरपणे बगल दिली, इतर मुद्द्यांबाबत उत्तर दिले, आपल्या कार्यालयाने 4 जून 2021रोजी पुन्हा मूळ मुद्द्याला बगल न देता अनूज्ञेय नसलेली वेतनश्रेणी घेतल्याबद्दल स्वयं स्पष्ट खुलासा करावा असे सुचविले, तेव्हा पाटील यांनी पाच जून 2021रोजी सादर केलेल्या खुलाश्यातून ती बाब अनावधानाने घडल्याचे म्हटले. अतिप्रदान झालेली रक्कम भरण्याची अप्रत्यक्ष तयारी सुद्धा दर्शविली.
पाटील यांच्यासारख्या अनुभवी अधिकार्‍यांकडून आणि ज्यांची मूळ अस्थापना मंत्रालय प्रवर्गातून झालेली असताना ही बाब अनावधानाने घडली असे म्हणणे संयुक्त वाटले नाही, असे म्हणणे चुकीचे होते असेही कुलगुरू डॉक्टर धवण यांनी या पत्रातून म्हटले आहे.

COMMENTS