एक लाखाला प्रतिदिन १ हजार रुपये व्याज; सावकार अडकला कर्जत पोलिसांच्या जाळ्यात

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एक लाखाला प्रतिदिन १ हजार रुपये व्याज; सावकार अडकला कर्जत पोलिसांच्या जाळ्यात

कर्जत/प्रतिनिधी : कर्जत येथील एका व्यक्तीने ७ जुलै रोजी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी एजाज उर्फ गोप्या सय्यद (रा.कर्जत) याच्याविरुद्ध सावकरकी व इतर कलमा

शिक्षकांचे प्रलंबीत प्रश्‍नांची सकारात्मक पध्दतीने सोडवणुक होण्याची अपेक्षा -बाबासाहेब बोडखे
मंदिरातील दानपेटी फोडून पंधरा हजाराची रोकड लंपास 
काकाला नाही झाली सहन पुतण्याने केलेली चोरी…

कर्जत/प्रतिनिधी : कर्जत येथील एका व्यक्तीने ७ जुलै रोजी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी एजाज उर्फ गोप्या सय्यद (रा.कर्जत) याच्याविरुद्ध सावकरकी व इतर कलमान्वये कर्जत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, गेल्या वर्षी लागलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने तसेच ट्रॅव्हलिंगच्या गाड्या बंद झाल्याने तक्रारदाराने गाडीचे हप्ते भरण्यासाठी एजाज उर्फ भोप्या सय्यद याच्याकडुन ऑक्टोबर २०२० रोजी व्याजाने २ लाख रुपये घेतले होते. मात्र त्या व्याजाचा दर हा एक लाखाला प्रतिदिन १ हजार रुपये असा होता. त्यानंतरही ट्रॅव्हलिंगचा व्यवसाय व्यवस्थित चालत नसल्याने फिर्यादी यांनी सय्यद याच्याकडून टप्प्याटप्प्याने दिड लाख रुपये घेतले. या सर्व रकमेला लाखाला एक हजार रुपये याप्रमाणे व्याज द्यावे लागत होते. त्यानंतर आरोपीने व्याजाला चक्रीवाढ रक्कम लावल्याने मुद्लेची रक्कम ही ६ लाख रुपयांवर गेली.
फिर्यादीने व्याजापोटी ३ लाख रुपये दिले. ३ लाखांची रक्कम देऊनही ९ लाख रुपये आणखी द्यावे लागतील असे आरोपीने सांगितले.आरोपी हा पैसे वसुल करण्यासाठी गाडी अडवून दमदाटी व शिवीगाळ करत होता.त्याने फिर्यादीच्या स्विफ्ट कारची नोटरी करून त्याच्याकडून २ कोरे धनादेशही घेतले. ‘माझी सध्या पैसे देण्याची परीस्थिती नाही माझे व्याज माफ करा, मी तुम्हाला मुद्दल टप्प्याटप्प्याने देतो’ अशी विनंती केली मात्र आरोपीने काहीही ऐकले नाही.आरोपीच्या त्रासामुळे फिर्यादीची मानसिक स्थिती खराब झाली होती. दिलेल्या फिर्यादीवरून कर्जत पोलीस स्टेशन येथे कलम ३४१,५०४,५०६ तसेच महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ चे कलम ३९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव,पोलीस अंमलदार भाऊसाहेब यमगर, सचिन वारे यांनी केली असुन पुढील तपास पोलीस अंमलदार महादेव गाडे हे करत आहेत. पोलीस निरीक्षक यादव यांच्या मोहिमेने गोरगरीब,सर्वसामान्यांची होणारी लूट थांबली असुन नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

COMMENTS