’या’ सहा राज्यांतून महाराष्ट्रात येणार्‍यांना कोरोना चाचणी अनिवार्य

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

’या’ सहा राज्यांतून महाराष्ट्रात येणार्‍यांना कोरोना चाचणी अनिवार्य

महाराष्ट्र सरकारने केरळ, गोवा, राजस्थान, गुजरात, दिल्ली-एनसीआर, उत्तराखंड या सहा राज्यांना कोव्हिड संवेदनशील राज्य म्हणून घोषित करण्यात आले आहे.

‘विजय 69’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान अनुपम खेर जखमी
अहमदनगर मध्ये एका दिवसात कोरोनाचे ३५९२ नवे रुग्ण आढळले
बहुप्रतिक्षेत असलेले विवेकानंद शाळे जवळील रस्त्याचे कामास योगेश क्षीरसागर यांच्या माध्यमातून  नगरसेवक भैय्यासाहेब मोरे, रंजीत बनसोडे यांच्याकडून प्रत्यक्षात सुरुवात

मुंबई : महाराष्ट्र सरकारने केरळ, गोवा, राजस्थान, गुजरात, दिल्ली-एनसीआर, उत्तराखंड या सहा राज्यांना कोव्हिड संवेदनशील राज्य म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यानुसार या सहा राज्यांतून महाराष्ट्रात येणार्‍या प्रवाशांना 48 तास आधी कोरोना चाचणी करणे अनिवार्य असणार आहे आणि तो अहवाल निगेटिव्ह असल्यास त्यांना महाराष्ट्रात प्रवेश मिळणार आहे. 

या संदर्भात राज्य सरकारकडून रविवारी रात्री उशिरा एसओपी जारी करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपरोक्त सहा राज्यांना कोविड संवेदनशील राज्य म्हणून घोषित करण्यात आले आहे. या सहा राज्यातून महाराष्ट्रात येणार्‍या प्रवाशांना कोरोना चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह असणे बंधनकारक असणार आहे. राज्य सरकारकडून रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी ’ब्रेक द चेन’ अंतर्गत नियमावली तयार करण्यात आली आहे. या नियमावली अंतर्गत सहा राज्यांतून केवळ आरक्षित असलेल्या प्रवाशांना गाड्यांमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच प्रवास करणार्‍या प्रवाशाला कोरोनासदृश कोणतीही लक्षणं आहे की नाही, याची खात्री करूनच परवानगी दिली जाणार आहे. त्याशिवाय रेल्वे प्रशासनाने या राज्यातून येणार्‍या आणि जाणार्‍या रेल्वे गाड्यांची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाला द्यावी, असेही यात नमूद करण्यात आले आहे.

COMMENTS