मोदींच्या दौर्‍याला विरोध, आंदोलनात पाच बळी

Homeताज्या बातम्यादेश

मोदींच्या दौर्‍याला विरोध, आंदोलनात पाच बळी

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बांगला देश दौर्‍यावर आहेत.

औरंगाबादचे नाव सरकारी दरबारी बदलू नका
प्लास्टीक बंदीची अपरिहार्यता !
भाजपा यु वा मोर्चाने हर घर तिरंगा उपक्रमाची जबाबदारी यशस्वी पार पाडली- आमदार मोनिका राजळे

ढाकाः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बांगला देश दौर्‍यावर आहेत. त्यांच्या या दौर्‍याला काही कट्टरपंथी लोकांनी विरोध केला आहे. कट्टरपंथी लोकांनी या त्यांच्या या दौर्‍याविरोधात आंदोलन सुरू केले असून या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे.  या पार्श्‍वभूमीवर शहरांमध्ये बॉर्डर गार्ड्स तैनात करावे लागले आहेत. शनिवारी एका अधिकार्‍याने यासंदर्भातील माहिती दिली. ढाका येथील एका मशिदीतून शुक्रवारी सुरू झालेले हे हिंसक आंदोलन हळहळू बांगला देशाच्या अनेक प्रमुख जिल्ह्यांमध्ये पसरले. यामध्ये आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाले.  

दरम्यान, हिंसक आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर बांगला देशामध्ये फेसबुकवरही बंदी घालण्यात आली आहे. युझर्सच्या तक्रारीनंतर शुक्रवारी मध्यरात्रीपासून फेसबुक बंद करण्यात आले. सोशल मीडियावर अनेक हिंसक फोटो आणि रिपोर्ट शेअर केले जात होते, असे कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले. दुसरीकडे शुक्रवारी रात्रीपासूनच बांगला देशचया बॉर्डर गार्ड्सना तैनात करण्यात आल्याची माहिती बॉर्डर गार्ड बांगला देशाच्या प्रवक्त्यांनी दिली. बॉर्डर गार्ड बांगला देश ही कायदा सुरव्यवस्था राखण्यासाठी एक आरक्षित निमलष्करी दल म्हणून काम करते. गृह मंत्रालयाच्या निर्देशांनुसार आणि नागरिक प्रशासनाच्या सहाय्यतेने देशातील निरनिराळ्या भागांमध्ये आवश्यक त्या संख्येत बॉर्डर गार्ड्सना तैनात करण्यात आले आहे. गार्ड्सच्या तैनातीनंतर कोणत्याही प्रकारची हिंसक घटना घडली नाही. सध्या संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आहे, अशी माहिती लेफ्टनंट कर्नल फैजुर रहमान यांनी दिली. दरम्यान, त्यांनी किती गार्ड तैनात करण्यात आले आहेत, याबाबत मात्र माहिती दिली नाही. कट्टरतावादी इस्लामिक समूह हेफाज़ात-ए-इस्लामच्या चार सदस्यांचे मृतदेह चटगाव येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात आणण्यात आले. एका ग्रामीण भागात हिंसा भडकवल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती एका पोलिस अधिकार्‍याने दिली. यावर हेफाज़ात-ए-इस्लामकडूनही प्रतिक्रिया देण्यात आली. शुक्रवारी मोदी यांच्या बांगला देश दौर्‍याच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. या समूहाने ी शांततापूर्ण आंदोलन करणार्‍या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या विरोधात रविवारी पुन्हा आंदोलनाचा इशारा या समूहाच्या प्रवक्त्याने दिला. 

COMMENTS