Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सातारा जिल्ह्यातील संस्था मोडीत काढणारे जिल्हा बँकेत नको : खा. श्री. छ. उदयनराजे भोसले

सातारा / प्रतिनिधी : जिल्हा बँकेत काही जण मतदारांचा मतांचा अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न करतात. माझ्या मतदार संघातही असाच मतदानाचा अधिकार रद्

विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची पुन्हा हजेरी
सातारा जिल्हा बँकेच्या संचालक मंडळासाठी 21 नोव्हेंबरला मतदान
पाचोरा तालुक्यातील अवकाळी पावसाची हजेरी

सातारा / प्रतिनिधी : जिल्हा बँकेत काही जण मतदारांचा मतांचा अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न करतात. माझ्या मतदार संघातही असाच मतदानाचा अधिकार रद्द करण्याचा डाव काहींनी रचला होता. पण आम्ही वकील देऊन पुन्हा त्या मतदार सभासदांना मतांचा अधिकार कायम ठेवला, असा गौप्यस्फोट राज्यसभेचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केला. ज्यांनी सहकारी संस्था मोडकळीस आणल्या, संस्थांचे खासगीकरण केले, अशा व्यक्तींना जिल्हा बँकेपासून सभासदांनी दूर ठेवावे, असा सल्ला त्यांनी दिला. दरम्यान, पुण्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठकीवरून मतदार सभासदांची बैठक घेऊन त्यांचे मत जाणून घेतले असते तर जास्त सयुक्तिक झाले असते, असा खोचक टोलाही त्यांनी लागावला.
सातारा शहरातील गोडोली येथे एका समारंभादरम्यान, उदयनराजे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी जिल्हा बँकेच्या विषयावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीकेची झोड उठवली.
उदयनराजे म्हणाले, जिल्हा बँक शेतकर्‍यांसाठी आहे. त्यांना कर्ज मिळावे, त्यातून त्यांची प्रगती कशी होईल, यासाठी जे कोणी निवडून जाणार आहेत, त्यांनी शेतकर्‍यांचे हित जोपासले पाहिजे. काही वेळेस नको ते लोक आपण निवडून देतो आणि बँक किंवा संबंधित संस्थेचे खासगीकरण झालेले पाहायला मिळते. सहकारी संस्था मोडीत काढल्या जातात. आपले नशीब चांगले आहे, की सातारा जिल्हा बँकेचे कामकाज चांगल्या प्रकारे सुरु आहे.
अलीकडे बँकेत मतांचे राजकारण सुरू आहे. गृहनिर्माण असेल दुग्ध विकास, पाणी पुरवठा मतदारसंघ असेल, येथील मतदारांचा मतांचा अधिकार रद्द कसा होईल, यासाठी काही जण प्रयत्न करतात. मुळात सभासदांनी मतदान कोणाला कारायचे हा त्यांचा अधिकार आहे. पण मतदान त्यालाच करा, यालाच करा, असे बंधन घातले जाते. बँक एका उंचीवर राहावी, बँकेला गालबोट लागू नये, याचा विचार झाला पाहिजे. मतदारांनी मतदान करू नये, यासाठी काहीजण प्रयत्न करतात. माझ्या मतदार संघातही असाच प्रयत्न झाला. पण आम्ही वकील देऊन त्या मतदारांचे अधिकार कायम ठेवण्यात यशस्वी झालो. त्यामुळे सभासदांनी संचालकांना निवडून देताना संबंधित संचालकांमुळे किती संस्था मोडकळीस निघाल्या हे लक्षात घ्यावे. मगच त्यांना निवडून द्यायचे, की नाही, हे ठरवावे, असे त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादीच्या पुण्यातील बैठकीविषयी उदयनराजे म्हणाले, बैठक आहे हे मला वृत्तपत्रातील बातमीवरून समजले. कोणाला निमंत्रण होते, कोणाला नाही हे मला माहीत नाही. पण निमंत्रण सगळ्यांना द्यायला हवे होते. मुळात सभासदांसोबत बैठक घेऊन त्यांच्याशी साधक बाधक चर्चा करायला हवी होती. यामध्ये उदयनराजेंना निवडून द्यायचे का नाही, असे विचारायला हवे होते. पण काहीजण स्वतःचा गाढा पुढे रेटत आहेत.

COMMENTS