मुळा धरणात बुडताना एकाला वाचवले, दुसऱ्याचा मृत्यू

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुळा धरणात बुडताना एकाला वाचवले, दुसऱ्याचा मृत्यू

देवळाली प्रवरा प्रतिनिधी : राहुरी शहरातील एका हॉटेलमध्ये काम करुन उपजीविका चालवणारे तरुण स्वातंत्र्य दिनाच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी मुळा धरणावर गे

ऊस वाहतूक करणार्‍या वाहनांना रिफ्लेक्टिव्ह टेप गरजेचा : महेश भोजने
संगमनेर गोवंश कत्तलखाना कारवाई प्रकरण; प्रांत कचेरीसमोर ठिय्या आंदोलन
तरुणाकडून कुटुंबातील नातेवाईंकावर हल्ला ; दोघांचा मृत्यू | ‘सुपरफास्ट महाराष्ट्र’ | Lok News24

देवळाली प्रवरा प्रतिनिधी : राहुरी शहरातील एका हॉटेलमध्ये काम करुन उपजीविका चालवणारे तरुण स्वातंत्र्य दिनाच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी मुळा धरणावर गेले. चमेली विश्रामगृहाच्या पाठीमागिल बाजुस दोघे जण पोहण्यास उतरले पण खोलीचा अंदाज न आल्याने गटंगळ्या खात असताना मासेमारी करणाऱ्या दोन तरुणांनी एकाला वाचवले.दुसरा माञ पाण्यात दिसेनअसा झाला. राञी उशिरा पर्यंत त्याचा शोध घेतला पण मिळून आला नाही. स्वातंत्र्य दिनाची सुट्टी जीवार बेतली.               

याबाबत पोलीस ठाण्याकडून मिळालेली माहिती अशी की, रविवारी १५ ऑगस्ट निमित्त हाँटेलला सुट्टी असल्याने  सुट्टीचा आनंद घेण्यासाठी चौघा मिञांनी  मुळा धरणावर गाठले.  राहुरी शहरातील वैशाली हॉटेलमध्ये काम करणारे चार जण धरणाच्या चमेली विश्रामगृहा जवळ बसले.  बिरेंदरसिंग रावत (रा. उत्तराखंड) व रावसाहेब भिमराज मते (वय ४०, रा. मुलनमाथा, राहुरी) हे दोघे जण पोहण्यासाठी मुळा धरणाच्या पाण्यात उतरले. परंतू पाण्याचा व खोलीचा अंदाज न आल्याने हे दोघे गटांगळ्या खाऊ लागले. हि घटना दुपारी एक वाजता घडली. धरणात मासेमारी करणारे विकास गंगे व इंद्रजीत गंगे यांनी दोघांना बुडताना पाहिले.हे दोघे मदतीला धावले. या दोघांनी बिरेंदरसिंग रावतला बुडतांना वाचविले.त्याला काठावर पोहच करे पर्यंत रावसाहेब मते पाण्यात गायब झाला. यांचे दोन मिञ  घाबरुन गेल्याने त्यांनी घटनास्थळावरुन धूम ठोकली. घटनास्थळी शेकडो पर्यटक बघ्यांची गर्दी जमली.परंतू व्हीडीओ व फोटो काढणाऱ्या नेटकर्‍यांच्या काळजाला पाझर फुटला नाही. पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांना घटनेची माहिती समजताच  पोलीस उपनिरीक्षक नीरज बोकील, पो.हे.काँ. अण्णासाहेब चव्हाण, पो.काँ.संजय शिंदे घटनास्थळी दाखल झाले.राञी उशिरा पर्यंत मासेमारी करणाऱ्या किशोर बर्डे, विकास गंगे, इंद्रजीत गंगे, चंदू बर्डे, शक्तीलाल गंगे, लहू बर्डे, अशोक गायकवाड, किरण सूर्यवंशी यांच्या मदतीने होडीतून व ट्यूबच्या साहाय्याने पाण्यात गळ टाकून शोधण्याचा प्रयत्न केला पण यश आले नाही. सोमवारी  सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आले. दुपार पर्यंत मते याचा शोध लागला नाही.

चौकटपर्यटकांनी सुचनाचे पालन करावे

आंधळेमुळा धरणाच्या चमेली विश्रामगृहाकडे पर्यटक जाऊ नयेत. यासाठी नाले खोदुन त्यात वृक्षारोपण करण्यात आले. परंतु, पर्यटकांनी नाले बुजवून रस्ता केला आहे. त्याठिकाणी सुचना वजा फलक लावण्यात आलेला आहे. पर्यटकांनी पाण्यात उतरु नये. यासाठी फलकावर सुचना दिल्या आहेत. पर्यटक माञ या सुचनांकडे दुर्लक्ष करुन विश्रामगृहाच्या मागिल बाजुने धरणात उतरतात. त्यामुळे दुर्घटना घडतात. पर्यटकांनी सुचनाची अंमलबजावणी केली तर दुर्घटना टळू शकतात.  अण्णासाहेब आंधळे, मुळा धरण शाखाधिकारी.

COMMENTS