मुख्यालयी न राहणाऱ्या महावितरणच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी

Homeताज्या बातम्याराजकारण

मुख्यालयी न राहणाऱ्या महावितरणच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी

कळवण : शहर प्रतिनिधी कळवण विभागातील महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीचे जे अधिकारी मुख्यालयी राहत नाहीत त्यांच्यावर कायदेशिर कारवाई करून त्यांची वर

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात मोडी लिपी कार्यशाळा संपन्न
जन्मदात्या आईने आपल्या 39 दिवसाच्या बाळाला चौदाव्या मजल्यावरून फेकले
नगर तालुक्यातील नागरदेवळे होणार लवकरच नगरपालिका

कळवण : शहर प्रतिनिधी

कळवण विभागातील महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीचे जे अधिकारी मुख्यालयी राहत नाहीत त्यांच्यावर कायदेशिर कारवाई करून त्यांची वरीष्ठांनी गोपनिय चौकशी करण्याची मागणी राष्ट्रीय कॉग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सागर जगताप यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या पत्रकात केली आहे. शासनाच्या आदेशान्वये शासकीय तसेच निमशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश असतांना कळवण विभागातील महावितरणचे अधिकारी तसेच कनिष्ठ अभियंता हे मुख्यालयी राहत नसुन, शासनाच्या आदेशाला केराची टोपली यांच्याकडून दाखविली जात आहे .. महावितरणचे अधिकारी व कर्मचारींना शासनाने लागु केलेला घरभाडे भत्ता ते मुख्यालयी न राहता घेत असल्याने त्यांच्याकडून शासनाची सुद्धा आर्थिक फसवणुक होत असल्याने संबधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे .. कळवण विभाग व शहरातंर्गत १ कार्यकारी उपअंभियंता , कळवण शहर अर्बनला १ , आर – २ विभागासाठी १ , तसेच देसराणे , दळवट , अभोणा , मानुर , निवाणे आदी ठीकाणी कनिष्ट अभियंताचे विभाग असुन,, प्रत्येक अभियंत्यांच्या ताब्यात मोठे परिसर आहेत .. त्यातील काही महाभागांनी स्थानिक घरमालकांचे खोटे प्रमाणपत्र तयार करुन शासनास सादर केले असल्याचे समजले असुन , शासनाची या महाभांगाकडून आर्थिक फसवणुक होत असुन मोठयाप्रमाणात यांच्याकडून भाडे आकारणी होत असल्यामुळे ” आंधळ दळतयं आणि कुत्र पिठ खातंय ,, अशी अवस्था झाली आहे .कळवण महावितरण विभागात नव्याने रुजू झालेले कार्यकारी अभियंता यांचा संबधितांवर वचक नसल्याने त्यांची मनमानी वाढतच आहे .. वरीष्ठ स्तरावरुन शासनाची फसवणुक करणाऱ्या या महाभांगाची गोपनिय चौकशी करण्याची मागणी यावेळी कॉग्रेस शहराध्यक्ष सागर जगताप यांनी केलीं आहे..

COMMENTS