Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतकर्‍यांनी कर्ज फेडण्यासाठी अवयच काढले विक्रीला

किडनी 75, लिव्हर 90 तर डोळ्यांची 25 हजार किंमत

हिंगोली : राज्यात यंदा दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे कर्ज फेडायचे कसे, हा यक्षप्रश्‍न शेतकर्‍यांसमोर उभा ठाकला आहे. कर्ज फेडण्याची परिस्थिती नसल्

‘सुपरस्टार सिंगर 2’चा विजेता ठरला मोहम्मद फैज
सत्तासंघर्षावर 29 नोव्हेंबरला सुनावणी
साताऱ्यातील पालीची खंडोबा यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न

हिंगोली : राज्यात यंदा दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे कर्ज फेडायचे कसे, हा यक्षप्रश्‍न शेतकर्‍यांसमोर उभा ठाकला आहे. कर्ज फेडण्याची परिस्थिती नसल्यामुळे मराठवाड्यात शेतकर्‍यांच्या आत्महत्येचा आकडा वाढतांना दिसून येत आहे. मात्र हिंगोलीतील शेतकर्‍यांनी चक्क आपले अवयवच विक्रीला काढले आहेत. अवयव विकत घ्यावे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन पाठवले आहे. शेतकर्‍यांनी दिलेल्या निवेदनात किडनीसाठी 75 हजार, लिव्हरसाठी 90 हजार, डोळ्यासाठी 25 हजार किंमत लावण्यात आली आहे.
राज्यात पाऊस कमी झाल्याने काही जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. सर्वाधिक भीषण परिस्थिती मराठवाड्यात आहे. पाऊस झाला नसल्याने पिके जालन्याच्या मार्गावर आहे. पिकांना पाणी नसल्याने उत्पादनावर परिमाण होणार आहे. परिणामी शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतमालाचे उत्पन्न मिळणार नसल्याने लागवडीचा खर्च देखील वसूल होणार नाही, यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. त्यात कर्जाचा डोंगर डोक्यावर असल्याने जगायचे कसे हा प्रश्‍न शेतकर्‍यांना भेडसावत आहे. सरकारकडून शेतकर्‍यांना लाभ मिळत नाही. या सोबतच पिकांना हमी भाव देखील नाही. अशा परिस्थितीत जगायचं कअसे असे म्हणत हिंगोली येथील शेतकर्‍यांनी थेट अवयव विक्रीला काढले आहेत. मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनावर शेतकरी गजानन कावरखे, दीपक कावरखे, विजय कावरखे, दशरथ मुळे, संजय मुळे, अशोक कावरखे, रामेश्‍वर कावरखे, गजानन जाधव, धीरज मापारी, नामदेव पतंगे आदींनी सह्या केल्या आहेत. हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातल्या गोरेगाव येथील दहा शेतकर्‍यांनी त्यांच्या अवयव विक्रीला काढले आहत. किडणी 75 हजार रुपये दहा नग, लिव्हर 90 हजार रुपये दहा नग, डोळे 25 हजार रुपये दहा नग अशी रक्कम त्यांनी ठेवली असून हे अवयव विकत घ्या अशी मागणी त्यांनी तहसीलदारामार्फत थेट मुख्यमंत्र्यांना केली आहे. या सर्व शेतकर्‍यांवर मोठ्या प्रमाणात कर्जाचा डोंगर आहे. सरकारी बँका, सावकार यांच्याकडून कर्ज घेऊन तर काहींनी उसने पैसे घेऊन पीक घेतले आहे. मात्र, पावसामुळे सर्व पीक वाया गेल्याने आम्ही शेतकर्‍यांनी आमचे अवयव विक्री करण्याचा निर्णय घेतल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले. या शेतकर्‍यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून, अवयव खरेदी करून कर्ज फेडावे अशी मागणी केली आहे.

COMMENTS