मुंबईत बनावट लसीकरणाचा आणखी एक प्रकार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईत बनावट लसीकरणाचा आणखी एक प्रकार

कांदिवली, बोरिवली आणि वर्सोवानंतर आता खारमध्येही बनावट लसीकरण शिबीर घेण्यात आले. टिप्स इंडस्ट्रीज लिमिटेड या निर्मिती संस्थेने फरार आरोपी राजेश पांडे याच्याच इव्हेन्ट ग्रुपच्या वतीने कर्मचारी आणि त्यांच्या नातेवाइकांसाठी हे शिबीर आयोजित केले होते. याप्रकरणात खार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

फरार असलेला गुंड बाळा दराडे अखेर जेरबंद
राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत कोपरगावच्या पाच खेळाडूंची निवड
नाविन्य आणि कौशल्यातून जिल्ह्याचे उत्पन्न वाढवावे-पालकमंत्री

मुंबई/प्रतिनिधीः कांदिवली, बोरिवली आणि वर्सोवानंतर आता खारमध्येही बनावट लसीकरण शिबीर घेण्यात आले. टिप्स इंडस्ट्रीज लिमिटेड या निर्मिती संस्थेने फरार आरोपी राजेश पांडे याच्याच इव्हेन्ट ग्रुपच्या वतीने कर्मचारी आणि त्यांच्या नातेवाइकांसाठी हे शिबीर आयोजित केले होते. याप्रकरणात खार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

    कांदिवली येथील हेरिटेज गृहनिर्माण सोयायटीमध्ये कोकिळाबेन रुग्णालयातील बडतर्फ मार्केटिंग प्रमुख राजेश पांडे आणि त्याच्या इव्हेन्ट ग्रुपने बनावट लसीकरण शिबीर राबविले. याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून पांडे आणि कथित डॉक्टर फरार आहे. या बनावट लसीकरणाची माहिती समोर आल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी या ग्रुपने लसीकरण शिबीर घेतले, तेथील लोक तक्रार करण्यासाठी पुढे येत आहेत. वर्सोवा पोलिस ठाण्यात मॅचबॉक्स प्रॉडक्शनच्या वतीने करण्यात आलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर बोरिवलीच्या आदित्य कॉलेजने लेखी तक्रार केली आहे. त्यानंतर आता खारमध्येही अशाच प्रकारे बनावट लसीकरण शिबीर घेतल्याचे उघड आले आहे. राजेश पांडे व संजय गुप्ता यांच्यासह इतर चौघांनी कोकिळाबेन रुग्णालयातर्फे कोव्हिशील्ड लसीकरण शिबीर आयोजित करीत असल्याची खोटी माहिती सांगून फसवणूक केल्याची तक्रार टिप्स इंडस्ट्रीज लिमिटेडमधील कर्मचार्‍यांनी केली आहे. या लसीकरण शिबिरात निर्मिती संस्थेमधील अधिकारी, कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय अशा 206 जणांनी लस घेतली. प्रत्येकी 1,380 याप्रमाणे पांडे आणि त्याच्या ग्रुपने दोन लाख 84 हजार 696 रुपये घेऊन त्याबदल्यात कोव्हिशील्डच्या नावाखाली काहीतरी भेसळयुक्त द्रवपदार्थ दिल्याचा आरोप तक्रारीत केला आहे. या तक्रारीवरून खार पोलिसांनी पांडे आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

COMMENTS