माणदेशातील तलावांत केवळ 10 टक्के पाणीसाठा उपलब्ध

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माणदेशातील तलावांत केवळ 10 टक्के पाणीसाठा उपलब्ध

गोंदवले / वार्ताहर : गेल्या दोन वर्षांत समाधानकारक पाऊस झाल्याने माणमधील राणंद, आंधळी व पिंगळी तलावात सध्या बर्‍यापैकी पाणीसाठा शिल्लक असून ऐन पावसाळ

‘काळू-बाळू’सह 6 मातब्बरांचे तमाशाचे फड बंद
ओबीसींच्या फसवणूकीसाठी सत्ताधारी-विरोधी पक्षांचे संगणमत!
सांगलीत भाजप ओबीसी मोर्चा कडून जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन

गोंदवले / वार्ताहर : गेल्या दोन वर्षांत समाधानकारक पाऊस झाल्याने माणमधील राणंद, आंधळी व पिंगळी तलावात सध्या बर्‍यापैकी पाणीसाठा शिल्लक असून ऐन पावसाळ्यात लोधवडे, गंगोती, मासाळवाडी व महाबळेश्‍वरवाडी येथील तलावांत ठणठणाट आहे. इतर तलावांतही केवळ दहा टक्के पाणीसाठा उरला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदाही पुरेसा पाऊस होऊन सर्व तलाब भरतील अशी आपेक्षा माणवासीयांनी व्यक्त केली होती. 

माण तालुक्यात पावसाच्या लहरीपणाचा फटका बसून लोकांना दुष्काळाला सामोरे जावे लागते. पाण्यासाठी टँकर तर जनावरांसाठी छावणीचा आधार घ्यावा लागतो. गेल्या दोन वर्षांत मात्र पडलेल्या पावसाला जलसंधारणाची साथ मिळाल्याने परिस्थिती बदलली. गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने तालुक्यातील सर्वत्र पाणीसाठे ‘ओव्हरफ्लो’ झाले होते. त्यामुळे यंदाही दुष्काळाच्या धगीपासून लोकांची सुटका झाली. मे महिन्यात काही भागाला अवकाळी तर सर्वत्र झालेल्या वळिवाच्या पावसाने दिलासा दिला होता. त्यामुळे काही लोकांना नुकसानीचा फटका सोसावा लागला. तालुक्यातील गावोगावी झालेल्या जलसंधारण कामामुळे पावसाचे पाणी त्या-त्या भागात साचून राहिल्याने अद्याप मोठ्या जलसाठ्यांपर्यंत पाणी पोहोचले नव्हते. त्यामुळे या तलावांतील पाणीपातळी घटत गेली आहे. 

सध्या सर्वत्र कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत असला तरी माण तालुक्यातील लोधवडे, गंगोती, मासाळवाडी व महाबळेश्‍वरवाडी तलाव अजूनही कोरडे आहेत. जांभूळणी, जाशी व ढाकणी तलावांत दहा टक्क्यांहून कमी पाणीसाठा आहे. आंधळीसह पिंगळी व राणंद तलावात पुरेसा पाणीसाठा आहे. पिंगळीच्या तलावात 52 टक्के पाणीसाठा आहे तर आंधळी तलावात 37.55 व राणंदमध्ये 25 टक्के वापरण्यास योग्य पाणीसाठा आहे. यंदा पावसाचा जोर कायम राहिल्यास सर्व तलाव लवकरच भरण्याची शक्यता आहे. 

COMMENTS