महिलेच्या पर्समधील सव्वा लाख पळवले

Homeताज्या बातम्याअहमदनगर

महिलेच्या पर्समधील सव्वा लाख पळवले

अहमदनगर/प्रतिनिधी - नगर मनमाड रोड दुचाकीवरुन जाणार्‍या महिलेच्या गळ्यातील पर्स मोटारसायकलवरील दोन अनोळखी स्वारांनी हिसकावून नेली. या पर्समध्ये रोख पै

कर्जतमध्ये लाकडाची अवैध वाहतूक करणारे पीकअप पकडले
महसूलमंत्री ना. थोरात यांच्या नेतृत्वामुळे संगमनेरचा सहकार पॅटर्न दिशादर्शक – नामदार कदम
नगरमधील सात पक्की अतिक्रमणे जमीनदोस्त

अहमदनगर/प्रतिनिधी – नगर मनमाड रोड दुचाकीवरुन जाणार्‍या महिलेच्या गळ्यातील पर्स मोटारसायकलवरील दोन अनोळखी स्वारांनी हिसकावून नेली. या पर्समध्ये रोख पैसे व दागिने मिळून सव्वा लाखाचा ऐवज होता. ही घटना नगर मनमाड रोडवरील हॉटेल लेमन स्पाईससमोर घडली.
याबाबतची वैभव दाविन बुलाखे (वय 21, राहणार पॅरिस हॉटेलजवळ, ख्रिश्‍चन कॉलनी, नगर) यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. ते आईसमवेत त्यांच्या दुचाकीवरून नगर-मनमाड रोडने हॉटेल लेमन स्पाईससमोरून जात असताना पाठीमागून मोटारसायकलवरून आलेल्या दोन अनोळखी स्वारांनी बुलाखे यांच्या आईच्या गळ्यातील पर्स आतील एक लाख पंचवीस हजार पाचशे रुपये किमतीच्या ऐवजासह हिसकावून नेली. त्यात 70 हजार रुपये रोख, सोन्याचे दागिने व एक मोबाईल होता. या प्रकरणी तोफखाना पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मुजावर करीत आहे.

COMMENTS