अकोलेकरांच्या दिवाळीची सुरमय सुरुवात

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अकोलेकरांच्या दिवाळीची सुरमय सुरुवात

अकोले /प्रतिनिधी : दीपावलीच्या पूर्व संध्येला  अकोलेतील  कलाकारांनी सादर केलेल्या 'आली माझ्या घरी दिवाळी' या संगीत मैफिलीने अकोलेकरांची मने जिंकली.अक

लग्नाला जाणारी वऱ्हाडीची गाडी कोसळली थेट दरीतl पहा LokNews24
नगरमध्ये नव्याने जिल्हा वाहतूक शाखा स्थापन
नगरमध्ये त्या पाच जणांच्या चौकशीची उत्सुकता ; बोठेला मदत; आणखी काहीजण पोलिसांच्या रडारवर

अकोले /प्रतिनिधी : दीपावलीच्या पूर्व संध्येला  अकोलेतील  कलाकारांनी सादर केलेल्या ‘आली माझ्या घरी दिवाळी’ या संगीत मैफिलीने अकोलेकरांची मने जिंकली.अकोलेतील जुन्या -नव्या  कलाकारांनी सादर केलेल्या विविध बहारदार गीतांनी हा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला आणि अकोलेकरांच्या दिवाळीची सुरमय सुरुवात झाली. अकोले रोटरी क्लबने कलाकार संघाच्या सहकार्याने अकोले महाविद्यालयाच्या बुवासाहेब नवले रंगमंचावर या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी जेष्ठ नेते मिनानाथ पांडे,जे.डी. आंबरे, ऍड वसंतराव मनकर, बाळासाहेब भोर,विजयराव पोखरकर, डॉ.उमा कुलकर्णी, सौ.शितल वैद्य,सतीश मालवणकर,भाऊसाहेब चासकर, संतोष शाळीग्राम, विलास लहामगे,अनिल कोळपकर,डॉ. सचिन नवले,भाऊसाहेब कासार, प्रवीण धुमाळ, चंद्रभान मालुंजकर,हेमंत पाबळकर, प्राचार्य जाधव, प्रा.राजेंद्र कर्पे आदी सह रसिक श्रोते उपस्थित होते.  प्रास्ताविक व स्वागत रोटरी चे संस्थापक अध्यक्ष अमोल वैद्य यांनी केले. यावेळी  ‘माझी रेणुका माऊली, कल्पवृक्षाची सावली’आली माझ्या घरी ही  दिवाळी,’ ‘घागर घेऊन, घागर घेऊन ‘दीपावली मनाई सुहानी मेरे साई के हाथो मे जादू का पाणी,’ ‘उगवली शुक्राची चांदणी ही गीते कोमल सावंत हिने गायिले. इंद्रभान कोल्हाळ यांनी ‘शोधीशी मानवा राऊळी मंदिरी’, ‘सजालो घर गुलशन सा,अवध मे राम  आये है,’माणसा इथे मी तुझे गीत गावे, असे गीत गावे तुझे गीत व्हावे”मल्हारवारी मोतीयांनी दयावी भरून, नाही तर देवा मी जातो दुरून’,’कानडा राजा पंढरीचा’ही गीते गाऊन  उपस्थितांची मने जिंकली. ” शिर्डी वाले साई बाबा, आया है तेरे दर पे ‘एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर,” ‘दिल के टूकडे टुकडे करके मुस्कराके चल दिये’ या गीतांनी सुधीर रूपवते यांनी  कार्यक्रमाची उंची वाढविली. सौ अरुणा पांडे यांनी ‘रुनूझुणू रे भ्रमरा’ हे सुमधुर  गीत म्हंटले.किशोर देशमुख यांनी ” जब दीप जले आना,जब श्याम ढले आना ”  हे गीत गायीले .त्यास रसिकांनी मनमुराद दाद दिली. सार्थक कोटकर  या बाल कलाकाराने ‘लख्ख पडला प्रकाश दिवट्या’. हे गीत सादर केले,    यावेळी दीपक महाराज देशमुख यांनी  ” दसरा  दिवाळी तोची सण” हा अभंग गाऊन सर्वांची दाद मिळविली.*  विलास गोसावी यांनी या मैफिलीचे प्रभावी सुत्रसंचालन केले. तसेच शरद पवार व मधुकरराव पिचड यांच्या हुबेहूब आवाजाने उपस्थितांची वाहवा मिळविली.सूत्र संचलन ह.भ.प.दीपक महाराज देशमुख यांनी  करत शेवटी आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  रोटरी चे अध्यक्ष सचिन आवारी,संदीप दातखिळे, प्रा डॉ सुरींदर वावळे, गंगाराम करवर, प्राचार्य विद्याचंद्र सातपुते, दीपक महाराज देशमुख, अमोल वैद्य,ऍड बी.जी.देशमुख,  सचिन शेटे,सचिन देशमुख,डॉ.रवींद्र डावरे, सुनील नवले,रोहिदास धुमाळ,रोहिदास जाधव, डॉ.सदाफुले,डॉ.संतोष तिकांडे,प्रवीण झोळेकर,मोखरे आदींनी विशेष  परिश्रम घेतले.

COMMENTS