भूमिगत कालव्याचा प्रस्ताव पुन्हा बारगळणार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भूमिगत कालव्याचा प्रस्ताव पुन्हा बारगळणार

खडकवासला ते फुरसुंगी दरम्यान असलेला 28 किलोमीटरचा कालवा भूमिगत करण्याचा विचार मागील काही दिवसांपासून सुरू होता; पण पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने या प्रकल्पाला मंजुरी न दिल्याने हा प्रकल्प पुन्हा एकदा बारगळला आहे.

स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय;  गुन्हा दाखल
बंगळुरूमध्ये पार्टीतून परतणार्‍या मुलीवर बलात्कार
नाल्याचा अंदाज आला नाही, दाम्पत्य थेट गटारातच घुसलं! | LOK News 24

 पुणे/प्रतिनिधीः खडकवासला ते फुरसुंगी दरम्यान असलेला 28 किलोमीटरचा कालवा भूमिगत करण्याचा विचार मागील काही दिवसांपासून सुरू होता; पण पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने या प्रकल्पाला मंजुरी न दिल्याने हा प्रकल्प पुन्हा एकदा बारगळला आहे. संबंधित कालवा भूमिगत केल्यानंतर ‘पीएमआरडीए’ आणि पुणे महापालिकेच्या हद्दीतील हजारो हेक्टर जागा रिक्त होईल. ज्याचा वापर व्यावसायिक कारणांसाठी केला जाऊ शकतो, त्यातून मोठा निधी उभारून भूमिगत कालव्याचा खर्च भागवता येईल, अशी ही योजना होती.

खडवासला धरण ते फुरसुंगी दरम्यान 28 किलोमीटरचा कालवा आहे. हा कालवा  ‘पीएमआरडीए’ आणि पुणे महापालिकेच्या हद्दीतून जातो. त्यामुळे या कालव्याने पुण्यातील बरीच जागा व्यापली आहे. त्यामुळे हा कालवा भूमिगत करण्याचा विचार केला जात होता. हा कालवा भूमिगत करण्यासाठी दीड हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता. त्याचबरोबर कालवा भूमिगत केल्यानंतर रिक्त होणार्‍या जागेचा व्यावसायिक कारणांसाठी वापर केला, तर त्यातून जवळपास 20 हजार कोटींचा निधी उभारला जाऊ शकतो. त्यामुळे हा कालवा भूमिगत करण्यासाठीचा खर्च पालिकेला आपल्या खिशातून करावा लागणार नव्हता. त्याचबरोबर हा कालवा भूमिगत केल्यामुळे बाष्पीभवन होऊन वाया जाणारे लाखो लिटर पाणी वाचेल. हेच पाणी पीएमआरडीएला उपलब्ध करून देता येऊ शकते, असेही जलसंपदा विभागाचे आयोजन होते. त्यासाठी या प्रकल्पाबाबतचा सविस्तर अहवाल पीएमआरडीने तयार करावा अशी अपेक्षा जलसंपदा विभागाला होती; पण पीएमआरडीने या प्रकल्पाला नकार दिल्याने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पुन्हा एकदा बारगळला आहे. यापूर्वीही जलसंपदा विभागाने भूमिगत कालव्याचा प्रस्ताव महापालिकेकडे पाठवला होता. कालव्यावरील रिक्त जागा खासगी व्यावसायिकाला उपलब्ध करून द्यावी, त्यासाठी संबंधित व्यावसायिकाने बोगद्याच्या कामाचा खर्च करावा आणि व्यावसायिकाला जागेच्या मोबदल्यात महापालिकेने टीडीआर द्यावा, असा प्रस्ताव होता. या प्रस्तावानंतर शहरात बराच गदारोळ झाला होता. त्यामुळे महापालिकेने हा प्रस्ताव फेटाळून लावला होता. यानंतर महापालिकेने दुसर्‍यांदा या प्रकल्पाला नकार दिला आहे.

COMMENTS