भाजपला मोठा झटका… सभापतींसह १३ संचालक जाणार शिवसेनेत

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजपला मोठा झटका… सभापतींसह १३ संचालक जाणार शिवसेनेत

परभणी,:  पूर्णा बाजार समितीचे सभापती बालाजी देसाई यांच्यासह 13 संचालकांनी भारतीय जनता पक्षास सोडचिठ्ठी देवून समर्थकांसह शिवसेनेत प्रवेशाचा निर्धार

भाजपच्या एकाही नेत्याची ईडी चौकशी का नाही ?
आरेतील झाडांची कत्तल नको : उद्धव ठाकरे
त्या निकालाचे न्यायालयाने मूल्यमापन करावे; सीबीआय संचालक मुदतवाढ याचिका

परभणी,: 

पूर्णा बाजार समितीचे सभापती बालाजी देसाई यांच्यासह 13 संचालकांनी भारतीय जनता पक्षास सोडचिठ्ठी देवून समर्थकांसह शिवसेनेत प्रवेशाचा निर्धार केला आहे.

गेल्या 23 वर्षांपासून बाजार समितीवर वर्चस्व गाजविणारे देसाई यांनी आपल्या समर्थकांची विजयादशमीच्या दिवशी व्यापक बैठक बोलावली. त्यातून भाजपास सोडचिठ्ठी द्यावयाचा निर्धार जाहीर केला. 

त्याप्रमाणे आपली या पक्षात घुसमट होत असल्यामुळेच आपण सोडचिठ्ठी देत आहोत असे देसाई यांनी नमूद केले. पाठोपाठ 13 संचालकांसह पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीरामाही जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम यांना पाठविला.

दरम्यान, देसाई हे लवकरच खासदार संजय जाधव, आमदार डॉ. राहुल पाटील, माजीमंत्री जयप्रकाश मुंदडा व जिल्हा प्रमुख विशाल कदम यांच्याशी हितगुज करीत प्रवेश करणार असल्याची माहिती हाती आली आहे

COMMENTS