भारतात लोकसभेच्या निवडणुका नुकत्याच संपल्या आणि कालच ब्रिटनमधील लोकसभेचा निकाल जाहीर झाला. हा निकाल संपूर्ण जगाला धक्का बसावा असाच राहिला. कारण,
भारतात लोकसभेच्या निवडणुका नुकत्याच संपल्या आणि कालच ब्रिटनमधील लोकसभेचा निकाल जाहीर झाला. हा निकाल संपूर्ण जगाला धक्का बसावा असाच राहिला. कारण, जगाने आधुनिकतेच्या नावाखाली जे भांडवलीकरण किंवा भांडवलशाहीचा जो निस्सीम स्वीकार केला होता, त्या स्वीकारालाच आता धक्का बसला आहे. १४ वर्षानंतर लेबर पार्टी पुन्हा सत्तेवर आली. जवळपास तीन निवडणुका पराभूत झाल्यानंतर लेबर पार्टीने आता ब्रिटनची सत्ता आपल्या हातात घेतली आहे. किर स्टार्मर यांच्या नेतृत्वात लेबर पार्टीने मिळवलेले यश, हे जगाला पुनर्विचार करायला भाग पाडणारे आहे! याचे कारण असे की, या पक्षाची नेते कीर स्टार्मर यांनी जो जाहीरनामा आपल्या निवडणुकीसाठी दिला होता, त्यामध्ये ज्या ५ गोष्टींचा समावेश करण्यात आला होता, त्या सहाच्या सर्व गोष्टी या समाजवादी अर्थव्यवस्थेच्या अनुषंगाने फार महत्त्वपूर्ण आहेत. त्यातील त्यांनी जी बाब म्हटली की, आम्ही आता पूर्णपणे देशात बदल घडवणार; त्यामध्ये आर्थिक बदल हा मोठ्या प्रमाणात करावा लागेल. कारण भांडवलीकरणाच्या किंवा भांडवलशाहीच्या नावावर जी आधुनिक व्यवस्था आणली गेली, त्याचा परिणाम ब्रिटिश जनतेच्या दारिद्र्य वाढण्यात झाल्याचे लेबर पार्टी मानते. आज अमेरिकेचे मिसीसीपी हे गरीब राज्य आहे. त्यापेक्षाही ब्रिटन मधल्या गरिबांची संख्या आता अधिक वाढली आहे. त्यामुळे सर्व समावेशक अर्थव्यवस्थेचा आता स्वीकार केला जाईल. त्याचबरोबर एनर्जी पाॅवर म्हणजे, ऊर्जा ऊर्जा निर्मिती क्षेत्राला अतिशय महत्त्व देण्यात आले आहे. त्या अनुषंगाने विजेचे बिल लोकांसाठी कमी करणे, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात नोकऱ्यांची निर्मिती करणे आणि प्रदूषण जे आहे, देशांमध्ये ते झिरो लेवलला कार्बन निर्माण करेल, असं उद्दिष्ट २०३० पर्यंत साध्य करण्याचं त्यांनी अभिवचन दिलेले आहे. शिवाय, भांडवलशाही अस्तित्वात आल्यानंतर जगभरातच एक प्रकारे हिंसक कारवाया मोठ्या प्रमाणात वाढल्या. त्याला ब्रिटन देखील अपवाद राहिला नाही. म्हणून किर स्टार्मर यांनी ब्रिटन मधील जो हिंसाचार आहे, तो निपटून काढला जाईल आणि शांततामय सहजीवन लोकांसाठी प्रदान केलं जाईल, असा निर्धार व्यक्त केला. नव्या पिढीला सुवर्णसंधी प्राप्त करून देण्यासाठी अगदी बालपणापासून त्यांच्या शैक्षणिक पद्धतीवर लक्ष दिलं जाईल आणि त्यांना त्यांची स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी योग्य त्या संधी निर्माण करून दिल्या जातील. त्याचप्रमाणे पाचवा त्यांचा जो अजेंडा होता की, जी सार्वजनिक आरोग्य व्यवस्था नॅशनल हेल्थ सिस्टीम ब्रिटनमध्ये काम करते, या सिस्टीमला मजबूत केलं जाईल आणि दर आठवड्याला किमान ४० हजार अधिक संख्येने रुग्ण तपासले जातील. त्यांची संपूर्ण व्यवस्था होईल, याची काळजी घेतली जाईल. हे त्यांनी थेटपणे सांगितले आहे. ब्रिटन हे नव्या पद्धतीने घडवलं जाईल. संपूर्ण बदल हा केला जाईल. या आव्हानासह कीर स्टार्मर यांनी आपल्या सर्व भूमिका जाहीरपणे मांडल्या. वास्तविक ४०० पार एवढ्या जागा घेऊन कीर स्टार्मर यांनी ऐतिहासिक विजय मिळवला. लेबर पार्टीला यापूर्वी ४१९ जागांपर्यंतचा विजय मिळाल्याचा इतिहास आहे. यावेळी त्यांना ४१० जागा मिळाल्या. ऐतिहासिक विजया नोंदविताना इतिहासाची बरोबरी करण्यात ते थोडेसे कमी पडले असले, तरी ज्या जिद्दीन कीर स्टार्मर यांनी आपल्या पक्षाचा विजय नोंदवला आणि तो विजय नोंदवल्या बरोबर ब्रिटिश चे मावळते पंतप्रधान ॠषी सुनक यांनी देशाची जाहीर माफी मागितली. या माफीचं कारण सांगताना निश्चितपणे त्यांनी स्वीकारलेल्या भांडवलशाहीच्या उदामपणाचा जो पराभव झाला आहे, तो ब्रिटिश जनतेने ठासून केला आहे. त्याचप्रमाणे या निवडणुकीत भारताप्रमाणे अनेक पक्षांचा उदय चांगल्या प्रकारे झाला आहे. खासकरून ग्रीन पार्टी जी पर्यावरणाच्या संदर्भात काम करते; या पक्षाला देखील पाच जागा या निवडणुकीत मिळवता आल्या. त्याचप्रमाणे ब्रिटन हा जो तीन प्रदेश म्हणून जो बनतो त्यात आयर्लंड, स्कॉटलंड आणि ब्रिटन. यापैकी स्कॉटलंडमध्ये जी स्कॉटिश नॅशनल पार्टी होती या पार्टीला पूर्णपणे पराभवाला सामोर जावं लागलं. या पराभवाचा नेमका अर्थ असा की, तथाकथित राष्ट्रवादाचा या निवडणुकीत पराभव झाला. त्याचप्रमाणे युद्धखोर आणि हिंसक प्रवृत्तींचा देखील या निवडणुकीत पराभव झाला. आयर्लंडच्या सिम्पनी या पक्षाला देखील या निवडणुकीत काहीसे यश मिळाले आहे. शिवाय, या निवडणुकीत इजराइल-पॅलेस्टीन युध्दाला विरोध केलेल्या जनतेचे हे मतदान लेबर पार्टीला यश मिळवून देणारे ठरले!
COMMENTS