पॅराऑलिम्पिकमध्ये भारताची पदकांची लयलूट… जिंकली चार पदके

Homeताज्या बातम्याविदेश

पॅराऑलिम्पिकमध्ये भारताची पदकांची लयलूट… जिंकली चार पदके

वेब टीम : टोकियोटोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताची पदकांची लूट सुरु आहे. भारतासाठी पदकांची लूट हा शब्द परिचयाचा नसला तरी टोकियो पॅरालिम्पिकमधील आपली काम

राज्यस्तरीय वरिष्ठ तायक्वांदो स्पर्धेत नगरला सुवर्णपदके
बलवान युवा पिढी हीच खरी देशाची संपत्ती : आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले
महिला क्रिकेट संघाच्या बसला भीषण अपघात

वेब टीम : टोकियो
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताची पदकांची लूट सुरु आहे. भारतासाठी पदकांची लूट हा शब्द परिचयाचा नसला तरी टोकियो पॅरालिम्पिकमधील आपली कामगिरी तशीच होतेय.

शनिवारी बॅडमिंटनमध्ये आपण एक सुवर्ण आणि एक कांस्य तर नेमबाजीत एक सुवर्ण व एक रौप्यपदक अशी चार पदके जिंकली आहेत. यासह आपली पदकांची संख्या ४ सुवर्ण, ७ रौप्य आणि ६ कांस्य अशी १७ पदकांची झाली आहे. यासह आपण पदकतालिकेत २६ व्या स्थानी आहोत.

आपल्या तिरंग्याचा मान शनिवारी बॅडमिंटनपटू प्रमोद भगत याने एसएल-३ गटात सुवर्णपदक आणि मनोज सरकारने याच गटात कास्यपदक जिंकून वाढवला. त्यांच्याआधी नेमबाजीत एसएच १ गटाच्या ५० मी. पिस्तुल प्रकारात १९ वर्षांच्या मनीष नरवालने सुवर्ण आणि ३९ वर्षांच्या सिंघराज अदाना याने रौप्यपदक जिंकले.

सिंघराजचे हे या पॅरालिम्पिकमधील दुसरे पदक आहे. ह्याच्या आधी त्याने टोकियोतच १० मी. एअर पिस्तुलचे एसएच १ गटात कास्यपदक जिंकलेले आहे. याप्रकारे अवनी लेखरानंतर एकाच पॅरालिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारा अदाना हाच एकमेव आहे.

बॅडमिंटनमध्ये प्रमोद भगत व मनोज सरकार यांचयाशिवाय सुहास यतीराज (एसएल ४), कृष्णा नागर (एस.एच.६), तरुण धिल्लन, प्रमोद भगत व पलक कोहली यांची जोडी यांनीसुद्धा पदक निश्चित केली आहेत.

फक्त कोणत्या रंगाचे पदक मिळणार याचा फैसला व्हायचा आहे. सुहास यतीराज व कृष्णा नागर हे तर अंतिम फेरीत पोहोचले आहेत. याप्रकारे आणखी किमान दोन रौप्यपदके निश्चित आहेत आणि दोन कास्यपदके आपल्या खात्यात येऊ शकतात.

COMMENTS