आणखी 30 पिशव्यांतून निघाले बेन्टेक्सचे दागिने ; नगर अर्बन बँकेचे बनावट सोनेतारण गाजणार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आणखी 30 पिशव्यांतून निघाले बेन्टेक्सचे दागिने ; नगर अर्बन बँकेचे बनावट सोनेतारण गाजणार

11 वर्षांची समृद्ध परंपरा असलेल्या नगर अर्बनमल्टीस्टेट शेड्युल्ड बँकेतील सोनेतारण घोटाळा गाजण्याचीचिन्हे दिसू लागली आहेत.

लोकसेवा हक्‍क कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी : आयुक्‍त चित्रा कुलकर्णी
आ. रोहित पवार यांनी घेतला कर्जत- जामखेडच्या महसूल विभागाचा आढावा
समताच्या शिबिरात 73 रक्तदात्यांनी केले रक्तदान

अहमदनगर/प्रतिनिधी- 111 वर्षांची समृद्ध परंपरा असलेल्या नगर अर्बनमल्टीस्टेट शेड्युल्ड बँकेतील सोनेतारण घोटाळा गाजण्याचीचिन्हे दिसू लागली आहेत. बुधवारी शेवगाव शाखेतील सोनेतारण कर्जाच्या पाचपिशव्यांतून बेन्टेक्सचे दागिने सापडल्यावर गुरुवारी आणखी 30 पिशव्यांतूनहीअसेच बेन्टेक्सचे दागिने सापडले. त्यामुळे सोने तारण कर्जाच्या सर्वच म्हणजे364 पिशव्यांतून असेच बनावट सोने सापडण्याचा संशय आहे. त्यामुळे याबनावट सोन्यावर दिलेले सुमारे 4 कोटीचे कर्ज बुडीत खात्यात जमाहोणार आहे. दरम्यान, बँकेने या सर्व पिशव्यांची तपासणी सुरू केली असून, याप्रकरणीयेत्या दोन-तीन दिवसात पोलिसात गुन्हा दाखल करणार असल्याचे बँकेचे प्रशासक महेंद्ररेखी यांनी सांगितले. 

नगर अर्बन बँकेसंदर्भात 3 कोटीचा चिल्लर घोटाळातसेच 22 कोटीची कर्ज फसवणूक प्रकरणी पोलिसात गुन्हे दाखल आहेत. याशिवायऔरंगाबाद शाखेत सापडलेल्या बनावट सोने तारण प्रकरणासह 8 विविध गैरव्यवहारप्रकरणीगुन्हे दाखल आहेत. या पार्श्‍वभूमीवर शेवगाव शाखेत बनावट सोने तारण ठेवूनत्यावर दिलेले कोट्यवधीचे कर्जही आता वादाच्या भोवर्‍यात सापडले आहे.सुमारे वर्षभरापूर्वी तत्कालीन प्रशासक मिश्रा यांनी शेवगावशाखेतील सोनेतारण कर्जाची भरपाई करीत नाहीत व तारण ठेवलेले सोनेही कर्जदारनेत नसल्याने या पिशव्यांचा लिलाव जाहीर केला होता. त्यावेळी तेथे 3 पिशव्याउघडल्यावर व त्यात बनावट सोने निघाल्यावर तो लिलाव स्थगित केला. त्यानंतरविद्यमान प्रशासक रेखी यांनी राहिलेल्या 364 पिशव्या नगरच्या मुख्यालयात आणून त्यांचालिलाव जाहीर केला. बुधवारी या लिलावाच्यावेळी पाच पिशव्या उघडल्यावर त्यातहीबेन्टेक्सचे दागिने आढळल्याने हा लिलावही स्थगित करण्यात आला असून, आताबँकेद्वारे राहिल्या सर्व पिशव्या उघडून त्यातील तारण ठेवलेले सोने खरे आहेकी खोटे, याची तपासणी केली जात आहे. 

या कामासाठी विशेष पथक तैनात केले गेले आहे. यापथकाने गुरुवारी आणखी 30 पिशव्या उघडल्यावर त्यातही बनावट सोने आढळले.त्यामुळे त्यांचा पंचनामा करून, त्याचे व्हीडीओ शूटिंगही करण्यात आले आहे.आणखी दोन ते तीन दिवस ही तपासणी मोहीम चालेल व सर्व पिशव्या तपासल्यावर यापैकीकिती पिशव्यांतून खरे सोने आहे व किती पिशव्यांतून खोटे सोने आहे, हेस्पष्ट झाल्यावर शेवगाव पोलिसात बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी संबंधितांविरुद्धगुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे प्रशासक रेखी यांनी सांगितले.

शेवगाव शाखेद्वारे सोने तारण कर्ज घेणार्‍या संबंधितकर्जदारांनी त्यांचे तारण ठेवलेले सोने सोडवून नेले नाही तसेच कर्जाचेहप्तेही भरले नसल्याने त्यांना बँकेद्वारे नोटिसा पाठवल्या होत्या. पण त्यांनात्यांच्याकडून काहीच प्रतिसाद मिळाला नसल्याने या सोन्याचा लिलाव जाहीर केलाहोता. मात्र, त्यात बहुतांश पिशव्यांतून बनावट सोने सापडले असल्याने संबंधितकर्जदारांविरुद्ध पोलिस कारवाई केली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

सावकारीचा संशय

नगर अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेतील बनावट सोनेतारण कर्जप्रकरणाच्या घोटाळ्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. बनावट सोने तारणठेवून त्यावर उचललेल्या कर्ज रकमेतून काहींनी सावकारी केल्याची चर्चा आहेे.त्यामुळे ज्यावेळी बँकेद्वारे पोलिसात या प्रकरणी फिर्याद दिली जाईल, त्यावेळीसंबंधित कर्जदारांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. पण बेन्टेक्सचे दागिने तारणठेवून त्यावर कर्ज लाटण्याचा हा प्रकार बँकींग वर्तुळात खळबळ उडवून गेलाआहे.

COMMENTS