बार्जच्या कॅप्टनविरोधात खुन्हा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बार्जच्या कॅप्टनविरोधात खुन्हा

तौक्ते चक्रीवादळाच्या दरम्यान पी-305 या बार्जवरील कामगारांचा जीव धोक्यात घातल्याबद्दल कॅप्टन राकेश बल्लव आणि इतरांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पी-305 बार्जच्या अभियंत्याने दिलेल्या तक्रारीनुसार हा गुन्हा यल्लो गेट पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. यल्लो गेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

काँग्रेस नेते पवन खेडांच्या विरोधात गुन्हा दाखल
बंदुकीचा धाक दाखवून बॉलिवूड अभिनेत्रीला लुटलं
सावकारांनो याद राखा : धन्यकुमार गोडसे

मुंबई / प्रतिनिधीः तौक्ते चक्रीवादळाच्या दरम्यान पी-305 या बार्जवरील कामगारांचा जीव धोक्यात घातल्याबद्दल कॅप्टन राकेश बल्लव आणि इतरांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पी-305 बार्जच्या अभियंत्याने दिलेल्या तक्रारीनुसार हा गुन्हा यल्लो गेट पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. यल्लो गेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

तौक्ते चक्रीवादळाचा बॉम्बे हाय क्षेत्रात असलेल्या तेल उत्खनन करणार्‍या बार्जना मोठा तडाखा बसला आणि मोठी मनुष्यहानी झाली आहे. वादळाच्या तडाख्यात पी-305 हा बार्ज बुडाला. या दुर्घटनेत आतापर्यंत 49 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 35 जणांचा शोध अद्याप सुरू आहे. ओएनजीसी कंपनीसाठी काम करणारे पी-305 हे बार्ज तौक्ते चक्रीवादळाची सूचना मिळाल्यानंतरही समुद्रातच होते. 16 मे रोजी मध्यरात्रीनंतर बार्जचा नांगर तुटला. त्यानंतर 17 मे रोजी त्यांनी मुंबईच्या डिजिटल कम्युनिकेशन (डीजीसीओएम) केंद्राला नांगर तुटल्याबाबत माहिती दिली होती त्यानंतर बचावकार्य सुरू करण्यात आले. तटरक्षक दल, भारतीय नौसेना यांनी मोठ्या प्रमाणावर बचावकार्य सुरू केले आणि अडकलेल्या अनेकांचे जीव वाचवले. पी-305 बार्जचा नांगर हा तौक्ते चक्रीवादळाच्या आधीच तुटला होता अशी माहिती मिळत आहे; मात्र डीजीसीओएमने यासंदर्भात ओनजीसीचे प्रवक्ते हरीश अवल यांना कळवले असता त्यांनी या प्रकरणाची माहिती नसल्याचे सांगितले. अ‍ॅफकॉन्सने त्यांची माणसे समुद्रात पाठवली होती अशी माहिती हरीश अवल यांनी दिली. अऍफकॉन्स ही कंपनी ओनजीसीसाठी काम करते. अ‍ॅफकॉन्सची माणसे त्या बार्जवर काम करत होती; मात्र अ‍ॅफकॉन्स  आणि ओएनजीसी या दोन्ही कंपन्यांनी बार्जची मालकी असणारे डूरमास्ट एंटरप्राइजेज आणि बार्जच्या कॅप्टनला या घटनेसाठी जबाबदार धरले आहे.

COMMENTS