फटका विक्री बंदीचा अध्यादेश प्रशासना कडून मागे

Homeताज्या बातम्याअहमदनगर

फटका विक्री बंदीचा अध्यादेश प्रशासना कडून मागे

नगर –  दिवाळी सण जवळ आल्याने लगबग व तयारी सुरु झाली आहे. दिवाळीत फटाक्यांना महत्व आहे. नगरच्या फटाका व्यापारी असोसिएशनच्या वतीने कल्या

पोलिसांनी केले तब्बल सव्वाचार लाखाचे मोबाईल जप्त
शीतल भागवतची अभियंतापदी निवड
टाकळी कडेवळीत डॉ. आंबेडकर जयंती सामाजिक उपक्रमांनी साजरी

नगर –  दिवाळी सण जवळ आल्याने लगबग व तयारी सुरु झाली आहे. दिवाळीत फटाक्यांना महत्व आहे. नगरच्या फटाका व्यापारी असोसिएशनच्या वतीने कल्याण रोडवर होलसेल फटाका विक्री मार्केट सुरु झाले आहे. महापौर रोहिणी शेंडगे यांच्या हस्ते फीत कापून फटाका विक्री मार्केटचे व प्रवेशद्वाराचे उत्घाटन करण्यात आले. यावेळी श्रीविशाल गणपती मंदिराचे पुजारी संगमनाथ महाराज यांचे शिष्य आदित्यनाथ महाराज, नगरसेवक सचिन शिंदे, नगरसेवक श्याम नळकांडे, सुवर्णा जाधव, दत्ता जाधव, फटाका व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा, सचिव संतोष बोरा, उपाध्यक्ष सोमनाथ रोकडे, सहसचिव अरविंद साठे, कार्याध्यक्ष सुरेश जाधव आदींसह सदस्य उपस्थित होते.

          महापौर रोहिणी शेंडगे म्हणाल्या, दिवाळी सण सर्वाना आनंद देणारा सण आहे. करोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण झाले आहे. फटका विक्री बंदी बाबतचा अध्यादेश नुकताच मागे घेण्यात आलेला असल्याने सर्व संभ्रम दूर झाले आहेत. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या उत्साहात व आनंदात दिवाळी साजरी करावी. अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा म्हणाले, दिवाळी हा सण फटाक्यांशिवाय साजराच होऊ शकत नाही. नाशिक विभागीय आयुक्तांनी फटका विक्री बंदी बाबत काढलेल्या अध्यादेशा मुळे थोडा संभ्रम झाला होता. मात्र आ.संग्राम जगताप, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ यांना विनंती केल्याने आता हा अध्याधेश मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी येथील ठोक मार्केट मधून भरपूर फाटके घ्यावीत. यावर्षी फटाक्यांच्या किमतीत कोणतीही दर वाढ झालेली नसल्याने नागरिकांना दिलासा मिळणार आहे. आदित्यनाथ महाराज म्हणाले, या सणासुदीच्या दिवसात सर्व नागरिकांनी शासनाच्या नियमांचे पालन करून स्वतःची काळजी घेत दिवाळीचा आनंद द्विगुणित करावा. प्रास्ताविकात संतोष बोरा म्हणाले, फटका व्यवसायावर हजारो नागरिकांचा उदरनिर्वाह असतो. नाशिक विभागीय आयुक्तांनी काढलेल्या आदेशा मुळे मोठा अन्याय फटका व्यापाऱ्यांवर झाला होता. मात्र आता हा आदेश मागे घेण्यात आल्याचे कळले आहे. याबद्दल प्रशासनाचे आभार. यावेळी फटका व्यापारी सुनील गांधी, अनिल टकले, संतोष वल्ली, देवीदास ढवळे, संजय सुराणा, विजय मुनोत, उबेद खान, गणेश परभणे, अमोल तोडकर, मयूर भापकर उपस्थित होते.

COMMENTS