पोलिसांनी केले तब्बल सव्वाचार लाखाचे मोबाईल जप्त

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोलिसांनी केले तब्बल सव्वाचार लाखाचे मोबाईल जप्त

कर्जत/प्रतिनिधी : कर्जत तालुक्यातील कुळधरण गावातील प्रमोद पोपट चव्हाण यांचे प्रगती मोबाईल दुकान 11 जुलै रोजी फोडून त्यातून पाच लाख वीस हजारांचे तब्बल

ऐन पावसाळ्यात नागरिकांची पाण्यासाठी वणवण… महापौरांच्या प्रभागात पाण्याचे संकट
नगर -पाथर्डी येथे चोऱ्या केलेला चोरास मिरजगाव येथे अटक
बेसुमार पाणी वापरणाऱ्यांनी किमान दहा पट तरी पाणी पट्टी भरावी : वाहडणे

कर्जत/प्रतिनिधी : कर्जत तालुक्यातील कुळधरण गावातील प्रमोद पोपट चव्हाण यांचे प्रगती मोबाईल दुकान 11 जुलै रोजी फोडून त्यातून पाच लाख वीस हजारांचे तब्बल 26 मोबाईल चोरटयांनी लंपास केले होते. अखेर पोलिसांनी या चोरांच्या मुसक्या आवळत त्यांच्याकडून तब्बल 4 लाख 20 हजारांचे 21 मोबाईल जप्त केले आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, 11 जुलै रोजी प्रमोद चव्हाण (रा. धालवडी, ता. कर्जत) यांचे प्रगती मोबाईल शॉपी दुकान रात्री कोणीतरी अज्ञात चोरट्याने दुकानाचे शटर उचकटून फोडले. दुकानातून 5 लाख 20 हजार रुपये किमतीचे 26 नवीन मोबाईल चोरून नेले. त्यावरून कर्जत पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा घडल्याच्या ठिकाणी पोलिस अधिकार्‍यांनी भेट देऊन गुन्हा उघड करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. परिसरातील गुन्हेगारांचा शोध घेत असतानाच गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मोबाईल शॉपीची घरफोडी ही आष्टी, जि. बीड तसेच बेनवडी, ता. कर्जत आणि करमाळा येथील आरोपींनी केली आहे तसेच आता ते आरोपी चिलवडी गावाच्या शिवारात वीटभट्टीवर काम करत आहेत, अशी माहिती मिळाल्याने पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांनी तात्काळ त्या ठिकाणी जाऊन सापळा लावून संशयित पप्पू सर्जेराव गायकवाड (वय 25 वर्ष, रा. धामणगाव, ता. आष्टी, जि. बीड) व सूरज बाळू गायकवाड (वय 20 वर्ष, रा. बेनवडी, ता. कर्जत) यांना ताब्यात घेऊन कसून विचारपूस केली. त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले. त्यानंतर त्यांनी अधिक माहिती दिली की, त्यांच्यासोबत आणखी दोन जोडीदार आहेत व ते खडकी (ता. करमाळा) येथील आहेत. पोलिसांनी माहिती घेवून खडकी येथे जाऊन विकास कैलास घोलवड (रा. खडकी, ता. करमाळा) यास शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडून 4 लाख 20 हजार 000 रुपये किमतीचे 21 मोबाईल जप्त करण्यात आले. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश माने, पोलिस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, पोलिस अंमलदार अंकुश ढवळे, सुनील माळशिकारे, पांडुरंग भांडवलकर, श्याम जाधव, सुनील खैरे, गोवर्धन कदम, अमित बरडे, गणेश भागडे, सागर म्हेत्रे, शकिल बेग, विकास चंदन, नितीन नरुटे यांनी केली.

COMMENTS