कर्जत : प्रतिनिधी कर्जत तालुका तालीम संघाचे अध्यक्ष प्रवीण घुले यांच्या वाढदिवसानिमित्त मित्र मंडळाच्या वतीने कर्जतमध्ये पैलवान चषक क्रिकेट स्पर्ध
कर्जत : प्रतिनिधी
कर्जत तालुका तालीम संघाचे अध्यक्ष प्रवीण घुले यांच्या वाढदिवसानिमित्त मित्र मंडळाच्या वतीने कर्जतमध्ये पैलवान चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. पोलीस इलेव्हन शिरूर हे पैलवान चषकचे मानकरी ठरले. तर एसआरपीएफ दौंड हा संघ उपविजेता ठरला. बुधवारी या स्पर्धेचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रवीण घुले यांचा वाढदिवसानिमित्त मान्यवरांनी सत्कार केला. या स्पर्धेतील विजेते ४ संघ व भूमिपुत्र खेळाडूंना बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, काँग्रेसचे बाळासाहेब साळुंके, युवकचे तालुकाध्यक्ष सचिन घुले, प्रा. किरण पाटील, विलास निकत, महेश तनपुरे, सचिन कुलथे, प्रसाद ढोकरीकर, बापूसाहेब नेटके, तात्यासाहेब ढेरे, अशोक भगत, संतोष म्हेत्रे, सुनील यादव आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.
नगरसेवक सचिन घुले व सहकाऱ्यांच्या उत्कृष्ट नियोजनाने पार पडलेल्या स्पर्धेतील अंतिम सामना अत्यंत चुरशीचा झाला. या सामन्यात पोलीस इलेव्हन शिरूर संघाने प्रथम फलंदाजी करत सहा षटकात ९६ धावा केल्या. यामध्ये कुणाल खोंड याने अर्धशतक करत जोरदार फलंदाजी केली. मोठे आवाहन घेऊन उतरलेल्या एसआरपीएफ दौड संघाला ही धावसंख्या सातत्याने पडलेल्या विकेटमुळे गाठता आली नाही. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार कुणाल खोंड यास तर उत्कृष्ट फलंदाज स्वप्नील भालेराव, उत्कृष्ट गोलंदाज संतोष कुदळे, मॅन ऑफ द सिरीज कुणाल खोंड यांना प्रदान करण्यात आला.
या स्पर्धेसाठी पंच म्हणून राणे, दीपक पिळगावकर, अक्षय चांदगुडे यांनी काम पाहिले. विजेत्यांना सन्मानचिन्ह हे डॉ. नितीन तोरडमल, प्रसाद कानगुडे व संजय काकडे यांचे वतीने देण्यात आले. स्पर्धेत अमोल भगत, अमित तोरडमल, नितीन गदादे, अतुल धांडे, विशाल तोरडमल, शेरखान पठाण, विजय मोरे, पिंटू शेलार यांनी उत्तम संयोजन केले. तर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रियेश सरोदे, शिवम कांबळे, राम जहागीरदार, रवी सुपेकर, राजू बागवान, अमोल तोरडमल, दीपक बोराटे, सुजित घोरपडे, विजय तोरडमल, उमेश गलांडे, गणेश लोखंडे, कार्तिक तोरडमल, कार्तिक शिंदे, आदित्य घुले, रिकी पाटील, प्रणित पाटील, अक्षय तोरडमल, माजीद पठाण, इम्रान पठाण, युनूस पठाण, हर्षदीप सोनवणे, स्वप्नील बोरकर, निखिल कोठारी, विकास पवार, भीमा थोरात यांनी विशेष परिश्रम घेतले.
COMMENTS