Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बेलगाव येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

डॉ.बाबासाहेब आंबेडकर नद्याजोड प्रकल्पाचे जनक ठरतात-प्रा.श्रीरंग पवार

आष्टी प्रतिनिधी - आज बेलगांव येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी भीमसैनिकांची मोठी रीघ लागली होती.सकाळी बुद्ध

तुफान राडा! लाऊडस्पीकरवरुन दोन गटांमध्ये दगडफेक; इंटरनेट सेवा बंद
पिस्तुलाचा धाक दाखवत व्यावसायिकाच्या कार्यालयात दरोडा | LOKNews24
बनावट दस्तऐवज करून प्लॉटची परस्पर विक्री, चौघांविरुद्ध गुन्हा

आष्टी प्रतिनिधी – आज बेलगांव येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी भीमसैनिकांची मोठी रीघ लागली होती.सकाळी बुद्धवंदना घेण्यात आली.त्यानंतर दिवसभर प्रतिमेला हार घालण्यासाठी नागरिकांची रांग लागली होती. यावेळी सायंकाळी व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.सर्वप्रथम भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे कार्यक्रमचे अध्यक्ष,प्रमुख अतिथी, सरपंच,उपसरपंच व जेष्ठ नागरिक यांच्या हस्ते पूजन करण्यात आले,’देश घडविणेचे काम डॉ आंबेडकर’ दामोदर नदी,सोन नदी,सतलज नदी,महानदी खोरे प्रकल्पाचा बहुउद्देशीय विकास घडवून आणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भाक्रानांगल धरण हिराकुंड धरण उभे केले आणि पाणी व्यवस्थापनाचा बृहत आराखडा तयार करून देशाला विकासाची नवी दिशा दिली.त्यामुळे ते नद्या जोड प्रकल्पाचे जनक ठरतात असे प्रतिपादन कार्यक्रमाचे मुख्य व्याख्याते भगवान कॉलेज आष्टी चे प्रा.श्रीरंग पवार यांनी केले.ते बेलगाव येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर 132 व्या जन्मोत्सव निमित्त शुक्रवार दिनांक 21एप्रिल 2023 रोजी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाप्रसंगी आधुनिक भारताच्या जडणघडणीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदानया विषयावर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. प्रसंगी युवा व्याख्याता आदित्य वांढरे व युवा व्याख्याती अंकिता पोकळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले, कार्यक्रमाचे मुख्य व्याख्याते भगवान कॉलेज आष्टीचे प्रा.श्रीरंग पवार सर,अंबिका विद्यालय बेलगांव चे निकाळजे सर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर व्याख्यान दिले,प्रसंगी पत्रकार अण्णासाहेब साबळे,निकाळजे सर हे उपस्थित होते,तर कार्यक्रमचे अध्यक्ष जेष्ठ नागरिक पोपट लक्ष्मण खंडागळे हे होते.तसेच बेलगांवचे मा.सरपंच बन्सी भाऊ पोकळे,जेष्ठ नागरिक भाऊसाहेब पोकळे,कारभारी भाऊ पोकळे, पोपट खंडागळे,संभाजी खंडागळे,दगडू खंडागळे हे होते,कार्यक्रम प्रसंगी गावचे विद्यमान सरपंच तात्यासाहेब शिंदे,उपसरपंच सतिष पोकळे, ग्रां.सदस्य.बाळू लक्ष्मण पोकळे,शिवाजी पोकळे,मारोती सरोदे,गणेश खोटे,बाळू खंडागळे,मा.उ ढोबळे सर,युवा उद्योजक प्रवीण वारे,आष्टी पो.चे पो कॉ.मुंढे साहेब,रामदासी साहेब बेलगावचे पो.पाटील गणेश पोकळे,ग्रामसेवक आरू साहेब, काकासाहेब पोकळे चेरमन या सर्वांचा शाल श्रीफळ व फेटा बांधुन सत्कार करण्यात आला.व रात्री 10 वाजता जामखेड येथील कलाकारांचा भीम गीतांचा बहारदार कार्यक्रम झाला   कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी रमाई प्रतिष्ठान बेलगांवच्या सर्व कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्याख्याते शिवश्री रविराज पोकळे सर यांनी केले.

COMMENTS