पार्थराज घाटगे हा तरुण परभणीतून बेपत्ता; कुटूंबियांसह पोलिसांचा शोध सुरु

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पार्थराज घाटगे हा तरुण परभणीतून बेपत्ता; कुटूंबियांसह पोलिसांचा शोध सुरु

 परभणी (प्रतिनिधी) : येथील नवामोंढा भागातील पार्थराज प्रवीण घाटगे हा 18 वर्षीय युवक शुक्रवारी (दि.06) आठ वाजल्यापासून बेपत्ता आहे.    वसंतराव नाईक मर

स्पर्धेतूनच बहुआयामी व्यक्तीमत्व घडते ः डॉ. महेंद्र चितलांगे
औषधे पुरवणे ठेक्याच्या आमीषाने 31 लाख रुपयांची केली फसवणूक
करुणा मुंडे राजकारणात उतरून धनंजय मुंडेंविरोधात लढणार…; नगरला केली शिवशक्ती सेना पक्षाची घोषणा

 परभणी (प्रतिनिधी) : येथील नवामोंढा भागातील पार्थराज प्रवीण घाटगे हा 18 वर्षीय युवक शुक्रवारी (दि.06) आठ वाजल्यापासून बेपत्ता आहे.    वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सहाय्यक प्रा. प्रवीण घाटगे यांनी नानलपेठ पोलिस ठाण्यात शनिवारी (दि.07) तक्रार दाखल केली. त्यातून पार्थराज हा शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास आई व आजोबा यांना आपण फिरण्यासाठी बाहेर जातो आहे म्हणून घराबाहेर पडला. परंतु, पार्थराज हा घरी परतला नाही. कुटूंबियांनी रात्री आकरा वाजेपर्यंत वाट पाहिली. मुलाकडे मोबाईल नसल्यामुळे मुलाचा शोध नातेवाईकांकडे, मित्रांकडे व शहरात इतरत्र घेतला. परंतु, तो मिळून आला नाही. किंवा त्याच्याबाबत काही माहितीही मिळाली नाही, असे नमूद केले.     दरम्यान पार्थराज प्रवीण घाटगे हा अठरावर्षीय युवक पाच फुट सात इंच उंचीचा, रंग गोरा, बांधा मध्यम, नाक मोठे, चेहरा गोल, केस काळे, दात पूर्ण, डोळे काळे, अंगामध्ये ग्रे कलरचे टी-शर्ट व हिरव्या रंगाची पॅन्ट अशा वर्णाचा आहे. त्यास मराठी व हिंदी या दोन्ही भाषा उत्तमरीत्या येतात. दरम्यान, नागरीकांना या वर्णाचा युवक सापडल्यास 9422879551 या क्रमांकाच्या मोबाईलवर संपर्क साधावा, असे आवाहन प्रा. प्रविण उध्दवराव घाटगे व नानलपेठ पोलिसांनी केले आहे.Attachments area

COMMENTS