Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आरोग्‍य तपासणी शिबिराला भरघोस प्रतिसाद

सन्मित्र मंडळाच्या वर्धापनदिनानिमित्त उपक्रमांचे यशस्‍वी आयोजन

नाशिक- नाशिकच्‍या वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत व अनुभवी डॉक्‍टरांनी स्‍वतः उपस्‍थित राहातांना रुग्‍णांची तपासणी करत मार्गदर्शन केले. लाडशाखीय वाणी

मुंबई विमानतळावर साडेचार कोटीचे सोने जप्त
पगारवाढीसाठी अवतार मेहेरबाबा कामगारांची निदर्शने
रोजगार हमी योजना प्रभावीपणे राबविण्याची गरज

नाशिक– नाशिकच्‍या वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत व अनुभवी डॉक्‍टरांनी स्‍वतः उपस्‍थित राहातांना रुग्‍णांची तपासणी करत मार्गदर्शन केले. लाडशाखीय वाणी समाज सन्मित्र मंडळातर्फे ३६ व्या वर्धापनदिनानिमित्त लायन्स क्लब ऑफ नाशिक रॉयल्स नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्‍या सर्वरोगनिदान व रक्तदान शिबिराला भरघोस प्रतिसाद मिळाला. ७५० पेक्षा जास्‍त नागरिकांनी आरोग्‍य तपासणी शिबिराचा लाभ घेतला. विशेष म्‍हणजे सर्व समाजातील महिला, पुरुषांनी या शिबिरात सहभाग नोंदवितांना उपक्रम यशस्‍वी केला.

शिबिरामध्ये अस्‍थिविकार तज्‍ज्ञ डॉ.विजय काकतकर, हृदयविकार व मधुमेह तज्ञ डॉ. पंकज राणे, मेंदू व मणकेविकार तज्ञ डॉ. अमित येवले, फिजिशियन डॉ. राहुल येवले,  मुत्रपिंड विकारतज्ञ डॉ. किशोर वाणी,  डॉ. विक्रांत काकतकर, डॉ. उत्कर्षा काकतकर, डॉ.सत्यजीत सोनजे, मेंदु व मणकेविकार तज्ञ डॉ. आनंद दिवाण, प्रसुती व अतिदक्षता तज्ञ डॉ. मकरंद राणे, वंध्यत्व निवारण व स्‍त्रीरोग तज्ञ डॉ. उमेश मराठे, स्त्रीरोग तज्ञ डॉ. शितल येवले, मुळव्याध व पोटविकार तज्ञ डॉ. उमेश येवलेकर,   नेत्रविकारतज्ञ डॉ. अभिजीत रामोळे, डॉ. तुषार छाजेड, फिजिओथेरेपिस्ट डॉ. मिनल कोतकर, डॉ. अंचल दिनानी, आयुर्वेदाचार्य डॉ. अपर्णा राऊत यांनी उपस्‍थित रुग्‍णांची तपासणी करत मार्गदर्शन केले. सकाळी शिबिराला सुरुवात झाल्‍यापासून नागरिकांची चांगली गर्दी झालेली होती. विशेष म्‍हणजे सर्व समाजातील बांधवांनी या शिबिरामध्ये सहभागी होतांना सुदृढ आरोग्‍याचा मंत्र जाणून घेतला. 

७५० हून अधिक रुग्‍णांनी शिबिरात सहभागी होतांना हे शिबिर यशस्‍वी केल्‍याची माहिती सन्मित्र मंडळाचे अध्यक्ष गिरीष महाजन, सचिव सचिन बागड , भूषण महाजन व वैद्यकीय समिती प्रमुख भूषण सोनजे, उपसमिती प्रमुख जितेंद्र येवले, गणेश येवला यांनी दिली. शिबिराच्‍या यशस्‍वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष गिरीश महाजन उपाध्यक्ष नीलेश मकर, प्रशांत शिरोडे, प्रतिभा वाणी, वर्षा महाजन, प्रणाली बागड, दिपश्री मेणे ,अतुल देशमुख, चंद्रकांत येवला, अमोल मुसळे, सचिन राणे,पंकज कोठावदे  रूपेश वरखेडे, राहुल ब्राम्हणकर यांच्‍यासह इतरही स्‍वयंसेवकांनी कठोर परीश्रम घेतले. सचिन अमृतकर यांनी सूत्रसंचालन केले 

विविध विकारांवर लाभले मार्गदर्शन – उपस्‍थित तज्‍ज्ञ डॉक्‍टरांनी विविध विकारांसंदर्भात मार्गदर्शन केले. तसेच काही मोफत तपासण्या करण्यात आल्‍या. यामध्ये रक्तातील साखरेची तपासणी, उच्च रक्तदाब, रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण, हाडांची ठिसुळता, रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण (एचबी), रक्तातील ३ महिन्यांची साखरेची तपासणी (एचबीए१सी), युरिक ॲसिड, थायरॉईड तपासणी, ईसीजी अशा 5 हजार रुपयांच्या विविध तपासण्या विनाशुल्‍क करण्यात आल्‍या. तसेच रुग्‍णांना त्‍यांच्‍या आरोग्‍याच्‍या तक्रारीचे निवारण करण्यासाठी तज्‍ज्ञ डॉक्‍टर उपस्‍थित होते. 

रक्‍तदानालाही अभुतपूर्व प्रतिसाद – यानिमित्त रक्‍तदान शिबिराचेही आयोजन केले होते. या शिबिरात सहभागी होतांना अनेक रक्‍तदात्‍यांनी आपली सामाजिक बांधिलकी जोपासली. शिबिरातून एकूण 171 रक्‍तपिशव्‍यांचे संकलन करण्यात आले. व 171 रक्‍तदात्‍यांनी शिबिरात सहभाग नोंदविला असल्‍याची माहिती पदाधिकार्यांनी दिली.

COMMENTS