पाटण तालुक्यातील कोव्हिड सेंटरसाठी सातारहून आणले ऑक्सीजन सिलिंडर; तहसिलदार योगेश्‍वर टोम्पे यांच्या कार्यतत्परतेचे जनतेतून स्वागत

Homeमहाराष्ट्रसातारा

पाटण तालुक्यातील कोव्हिड सेंटरसाठी सातारहून आणले ऑक्सीजन सिलिंडर; तहसिलदार योगेश्‍वर टोम्पे यांच्या कार्यतत्परतेचे जनतेतून स्वागत

माझा तालुका, माझी जबाबदारी या घोष वाक्यानुसार पाटणचे कार्यतत्पर युवा तहसिलदार योगेश्‍वर टोम्पे यांनी स्वतः सातारला जाऊन आपल्या पाटण तालुक्यातील कोव्हीड सेंटरसाठी ऑक्सिजन सिलिंडर आणल्याने शहरासह तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

महात्मा बसवेश्वरांनी सामाजिक समतेची ज्योत प्रज्वलित केली-शिवलीला पाटील
’रेसिडेन्शियल’ विद्यालयाच्या श्रमसंस्कार शिबिराचा समारोप
ऑक्सिजन प्लांट उभारण्याकडे मुंबई महापालिकेचे दुर्लक्ष


पाटण / प्रतिनिधी : माझा तालुका, माझी जबाबदारी या घोष वाक्यानुसार पाटणचे कार्यतत्पर युवा तहसिलदार योगेश्‍वर टोम्पे यांनी स्वतः सातारला जाऊन आपल्या पाटण तालुक्यातील कोव्हीड सेंटरसाठी ऑक्सिजन सिलिंडर आणल्याने शहरासह तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 

तालुक्यात सध्या 3 कोव्हीड सेंटर कार्यरत असून यामध्ये येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नवीन इमारत, मरळी येथील गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखालील लोकनेते बाळासाहेब देसाई कारखाना संचलित तसेच ढेबेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयातील सेंटरचा समावेश आहे. तालुक्यातील या सेंटरवर सुमारे 160 रुग्णांच्या उपचारासाठी सोय आहे. तालुक्यातील अधिकार्‍यांना गृहराज्यमंत्री देसाई यांनी रुग्णांना कोणत्याही परिस्थितीत ऑक्सिजनचा पडू देऊ नका, अशा सूचना बैठकीत दिल्या आहेत. पाटण तालुक्यातील प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, तहसीलदार योगेश्‍वर टोम्पे, पोलीस उपअधीक्षक अशोकराव थोरात व त्यांच्या टीम कोव्हीड काळात जीवाची पर्वा न करता कोणतीही सुट्टी न घेता दिवसरात्र कार्यरत आहे. ऑक्सीजन बेड उपलब्ध न झाल्याने तालुक्यातील अनेकांना प्राणास मुकावे लागले आहे. 

तहसीलदार टोम्पे हे ऑक्सीजन युक्त कोविड सेंटरसाठी जीवाचे रान करत असून रात्रंदिन आम्हा युध्दाचा प्रसंग या उक्तीप्रमाणे ते कार्यरत आहेत. रविवारी तहसीलदार टोम्पे यांनी स्वतः जबाबदारीने सातारा येथे जाऊन 24 ऑक्सिजन सिलिंडर येथील कोव्हीड सेंटरसाठी आणले. तहसिलदार पदाचा पदभार घेतल्यापासून तालुक्यातील अवैध खाणकाम, क्रशर व्यावसायिकांवर कारवाई करत आपल्या कार्याची चुणूक दाखवली होती.

रविवारी पाटण कोविड सेंटरसाठी त्यांनी ऑक्सिजन सिलेंडर जबाबदारीने ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्या सोबत डॉ. शिकलगार, पाटणचे तलाठी जयेश शिरोडे, लक्ष्मण लुगडे उपस्थित होते. तहसीलदार टोम्पे यांच्या या कर्तव्यदक्षता व तत्परतेने त्यांचे तालुक्यातील जनतेतून कौतुक होत आहे.

COMMENTS