पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांचे शनिदर्शन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांचे शनिदर्शन

सोनई--[ विजय खंडागळे]  देशात कोरोनाचा वाढता  प्रादुर्भाव पाहता गेले दोन वर्षे देवस्थाने बंद होती.त्यामुळे भाविक व नागरिक यांना दर्शन व्हावे अ

जिंकण्याची जिद्द निर्माण करण्यासाठी क्रीडा संस्कृती जोपासावी : सुनील केदार
क्रीडा संकुलांच्या प्रलंबित कामांकरिता निधी उपलब्ध करून देणार – क्रीडामंत्री सुनील केदार
सुनील केदार यांना उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

सोनई–[ विजय खंडागळे] 

देशात कोरोनाचा वाढता  प्रादुर्भाव पाहता गेले दोन वर्षे देवस्थाने बंद होती.त्यामुळे भाविक व नागरिक यांना दर्शन व्हावे अशी आस्था होती. ती,आता राज्य शासनाने देवस्थान नुकतेच खुले केल्याने भाविकांची दर्शनासाठी इच्छा पूर्ण होहून गर्दी होऊ लागली आहे. त्या अनुषंगाने काल शुक्रवारी( दि.८ रोजी) राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी पहाटे सहाच्या दरम्यान शनिशिंगणापूर येथे येऊन शनिदर्शन घेतले.शिर्डी येथून शनिशिंगणापूर येथे पहाटे आगमन झाले.

यावेळी पुरोहित अशोक कुलकर्णी यांनी विधिवत पूजा करून मंत्री केदार यांनी शनिदर्शन घेतले.देवस्थानच्या वतीने अध्यक्ष भागवत बानकर व कार्यकारी अधिकारी जी.के.दरदले यांनी ना.केदार यांचा सन्मान केला.

या प्रसंगी  महाराष्ट्र राज्य पशुचिकित्सक सेवादाता असोसिएशनचे वतीने अध्यक्ष डॉ. संतोष लांडे,उपाध्यक्ष डॉ. अनिल कोरडे,सचिव डॉ. राहुल काळे व खजिनदार डॉ.चंद्रकांत होन आदींनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. समवेत जेष्ठ मार्गदर्शक डॉ. नितीन पालवे,डॉ. दत्तात्रय लोहकरे, डॉ. भीमराज लांडे,अभिजित दरंदले,आदी संघटनेचे सदस्य होते.

दरम्यान पशुसंवर्धन विभागातील वरिष्ठ जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सुनील तुंभारे, सहायक उपायुक्त डॉ. माणिक धुमाळ,डॉ. अनिल बोठे, डॉ. राजेंद्र शेटे,पशुधन विकास अधिकारी डॉ. बी.आर.पंडुरे, नेवाश्याचे पशुधन विकास अधिकारी डॉ. बी.बी.दरदले, व डॉ.दत्तात्रय जठार आदींनी देवस्थान विकासा बाबत माहिती दिली.

या भागाचे राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री यांनी या भागात विकासात्मक योजनेचा वापर करून शनिशिंगणापूर देवस्थान देशाच्या नकाशा पटलावर नेल्याची प्रतिक्रिया ना.केदार यांनी व्यक्त केली.

कोरोनारोगाच्या भीतीमुळे काळजी म्हणून शासन निर्णय नुसार कोणतेही नियमांचे उल्लंघन न करता ना.केदार यांनी चौथऱ्याखालून शनिदर्शन घेऊन एक आदर्श निर्माण केला.

COMMENTS