गणेश चतुर्थीपासून जिओ 5 जी फोन बाजारात येणार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गणेश चतुर्थीपासून जिओ 5 जी फोन बाजारात येणार

गूगल आणि जिओ यांनी संयुक्तपणे जिओ नक्स्ट हा 5जी फोन तयार केलाय. आगामी 10 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर हा फोन लाँच होणार असल्याची घोषणा रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी गुरुवारी कंपनीच्या 44 व्या वार्षिक बैठकीत केली.

Sangamner : महिला बॉक्सिंग राज्यस्तरीय स्पर्धेत ऋतूजा राहाणेला कांस्य पदक (Video)
आठ महिन्‍याच्‍या बाळाचे अपहरण करत अडीच लाखात सौदा
यापूर्वी शेतमालाचे पेमेंट 24 तासाच्या आत का दिले नाही? भरत बोरणारे

नवी दिल्ली : गूगल आणि जिओ यांनी संयुक्तपणे जिओ नक्स्ट हा 5जी फोन तयार केलाय. आगामी 10 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर हा फोन लाँच होणार असल्याची घोषणा रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी गुरुवारी कंपनीच्या 44 व्या वार्षिक बैठकीत केली. भारतीय बाजारपेठेसाठी खास तयार केलेल्या जियोफोन नेक्स्ट स्मार्टफोनवर वापरकर्ते गुगल प्ले वरून अ‍ॅप्स डाउनलोड करू शकतात. 

स्मार्टफोनला सर्वोत्कृष्ट कॅमेरा आणि अँड्रॉइड अपडेटसुद्धा मिळतील. मुकेश अंबानी यांनी संपूर्णपणे फिचर स्मार्टफोनचे वर्णन केवळ भारतातच नव्हे तर जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन म्हणून केले आहे. गेल्या वर्षी रिलायन्स जिओने गुगलबरोबर भागीदारीची घोषणा केली होती. गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई नवीन स्मार्टफोनविषयी म्हणाले की, आमचे पुढचे पाऊल गुगल आणि जिओच्या सहकार्याने नवीन, परवडणार्‍या जिओ स्मार्टफोनपासून सुरू होत आहे. हा फोन भारतासाठी तयार करण्यात आला असून त्या लाखो नवीन वापरकर्त्यांसाठी आहे, जे पहिल्यांदाच इंटरनेटचा अनुभव घेतील. गूगल क्लाऊड आणि जिओ दरम्यान नवीन 5 जी भागीदारी भारतीयांना वेगवान इंटरनेटला जोडण्याला मदत करेल. सोबत भारताला डिजिटल करण्याची ही पायाभरणी असेल.यापूर्वी सूत्रांनी सांगितले होते की गेल्या एजीएममध्ये स्मार्टफोन जिओ-गूगल 5-जी ची घोषणा आज करण्यात येईल. प्राप्त माहितीनुसार या फोनची किंमत 3500 ते 5000 रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे. रिलायन्स कंपनीकडून स्वस्त 5-जी फोनची घोषणा देखील करण्यात आली आहे. देशात अद्याप 5जी सेवा सुरू करण्यात आली नाही. सध्या बाजारात उपलब्ध 5 जी फोनची किंमत 16 हजारांहून अधिक आहे.

यावेळी रिलायन्स जिओ जगातील सर्वात मोठा मोबाइल डेटा कॅरियर बनल्याचे कंपनीने सांगितले. केवळ मागील वर्षात डेटा खपातील ही 45 टक्के वाढ आहे. शिवाय, वापरकर्त्यांनी दरमहा 630 कोटी जीबी वापरला असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. 44 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मुकेश अंबानी यांनी खुलासा केला की, रिलायन्स जिओने या वर्षात 37.9 दशलक्ष नवीन ग्राहकांना जोडले आहे. कंपनी आता 425 दशलक्षाहूनही अधिक ग्राहकांना सेवा देत आहे. जिओ प्लॅटफॉर्मचा निव्वळ नफा 86,493 कोटी रुपये इतका आहे.

COMMENTS