खडसेंना संपविण्यासाठी ईडीची कारवाई : राज ठाकरे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खडसेंना संपविण्यासाठी ईडीची कारवाई : राज ठाकरे

पुणे : केंद्र सरकारकडून यंत्रणांचा चुकीच्या पद्धतीने वापर करण्यात येत आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँगे्रसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना देखील ईड

जरंडेश्वरचे भूत कुणाच्या मानगुटीवर बसणार ?
परमबीर सिंगांनी मागितला ईडीकडे वेळ
ईडीच्या जरंडेश्वर कारवाईनंतर पुढील नंबर कुणाचा ?

पुणे : केंद्र सरकारकडून यंत्रणांचा चुकीच्या पद्धतीने वापर करण्यात येत आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँगे्रसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना देखील ईडीची कारवाई मागे लावून संपविण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज ठाकरे पुणे दौर्‍यावर असून यावेळी त्यांच्या हस्ते पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
खडसे ईडीची सीडी लावणार म्हणाले होते. त्या सीडीची मी वाट पाहतोय, असा टोला राज ठाकरेंनी लगावला. काँग्रेसचे सरकार होते तेव्हाही असाच वापर करण्यात आला होता. भाजपचे सरकार आल्यानंतर तेदेखील वापर करत आहेत. ही काही तुमच्या हातातली बाहुली नाही. जिचा वापर तुम्हाला नको असलेला माणूस संपवण्यासाठी करायचा. ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. अशाप्रकारे करुन चालणार नाही. ज्यांनी गुन्हे केलेत ते मोकाट सुटले आहेत, असे ठाकरे म्हणाले. मराठा आरक्षणाच्या वेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीचे सरकार होते. त्यावेळी मुंबईतून मोर्चा निघाला होता. त्या मोर्चात सर्वच नेते गेले होते. सर्वांना मान्य आहे मग अडलंय कुठे, मराठा समाजातील तरुणी आणि तरुणांची माथी भडकवण्याचे काम सुरू आहे. जर केंद्रातील आणि राज्यातील सरकारला सुद्धा मान्य आहे तर मग अडले कुठे, आपण जे बोलतोय, ज्या बातम्या येत आहे, हे सर्व वरवरचे आहे. सर्वच मान्य असेल तर अडवले कुणी? पण मुळात कोर्टामध्ये याची बाजू व्यवस्थित मांडली का जात नाही. हा काही आरोप प्रत्यारोपाचा प्रश्‍न नाही. हे केंद्रामुळे होते, राज्यामुळे होते, असे कुणी म्हणू शकत नाही. सर्वांना एकदा व्यासपीठावर बोलावून नेमके काय ते विचारले पाहिजे, असेही राज ठाकरे म्हणाले. ’मी नवी मुंबई विमानतळाबद्दल माझी भूमिका मांडली. छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव हे कायम आहे. मी काही तिसरी मागणी केली नाही. उद्या जर मी पुण्यात राहण्यासाठी आलो तर राज मोरे होणार नाही’, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला

खडसेंच्या सीडीची वाट पाहतोय
मी एकनाथ खडसे यांच्या सीडीची वाट पाहत आहे. खडसे म्हणाले होते की, माझ्यामागे ईडी लावली तर सीडी लावीन, त्यामुळे ते सीडी कधी लावणार याची वाट पाहतो. याच्याआधी सुद्धा तपास यंत्रणाचा चुकीच्या पद्धतीने वापर झाला. काँग्रेसच्या काळात सुद्धा याचा वापर झाला आहे. आता भाजपच्या काळात सुद्धा ईडीचा वापर होत आहे, मुळात एखाद्या माणूस आपल्याविरोधात गेला म्हणून त्याला संपवण्यासाठी यंत्रणेचा वापर चुकीचा आहे’, असे राज ठाकरे म्हणाले.

COMMENTS