Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कर्जतमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग

कर्जत/प्रतिनिधी ः कर्जत शहरातील एका विद्यालयात शिकणार्‍या 11 वर्षाच्या मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी कर्जत पोलिसात

वाघोली ते शिरूर होणार दुमजली उड्डाणपूल… तळेगाव – अहमदनगर रस्त्यासाठी ५० हजार कोटींची तरतूद
कर्जत- जामखेडच्या ११५१ शिक्षकांना प्रशिक्षण
महाविद्यालयाच्या विकासात माजी विद्यार्थ्यांनी योगदान द्यावे – अ‍ॅड. देशमुख

कर्जत/प्रतिनिधी ः कर्जत शहरातील एका विद्यालयात शिकणार्‍या 11 वर्षाच्या मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी कर्जत पोलिसात विनयभंग तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम 2012 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्जत शहरानजीकच्या दळवी वस्ती येथील संपत लक्ष्मण पवार, वय : 54 याच्याविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवार याने शाळेतून घरी येत असलेल्या विद्यार्थिनीला रस्त्यात अडवून तुला पैसे देतो, असे म्हणत तिचा विनयभंग केला. हा प्रकार घरी सांगितला तर तुझ्या घरच्या लोकांना जीवे मारून टाकून अशी धमकी त्याने दिली. घरी परतल्यानंतर मुलगी रडत बसल्याने आईने विचारणा केली असता मुलीने घडलेला सर्व प्रकार सांगितला. याप्रकरणी मुलीच्या आईने पोलीस स्टेशन गाठून कलम 354 (अ), 506, बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम 2012 – 7 व 8 अन्वये गुन्हा दाखल केला. कर्जत पोलिसांकडून आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.

आरोपीच्या अटकेसाठी मराठा समाज आक्रमक – कर्जत शहरातील 11 वर्षाच्या मुलीचा विनयभंग या गुन्ह्यातील आरोपीला तात्काळ अटक करावी, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सकल मराठा समाज, कर्जत तालुका यांच्या वतीने देण्यात आला आहे. कर्जत तालुका सकल मराठा समाजाचे प्रमुख समन्वयक वैभव लाळगे, बळीराम धांडे, आदिनाथ धांडे, सागर कदम, महेंद्र धांडे, रावसाहेब धांडे, कृष्णा कदम, सुशेन कदम, गणेश भिताडे, अनिकेत भिताडे, सागर दळवी, परशुराम दळवी व आदी कार्यकर्त्यांनी हे निवेदन दिले आहे.

COMMENTS