पथनाट्यातून जनजागृती; संगमनेर परिषद व संगमनेर महाविद्यालयाचा उपक्रम

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पथनाट्यातून जनजागृती; संगमनेर परिषद व संगमनेर महाविद्यालयाचा उपक्रम

प्रतिनिधी संगमनेर संगमनेर नगर परिषद व राष्ट्रीय सेवा योजना , संगमनेर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने माझी वसुंधरा अभियान  अंतर्गत पर्या

शिर्डीतील हॉटेल व्यवसायिकाची 40 लाखांची फसवणूक
शेततळ्यामध्ये पाय घसरून एकाचा मृत्यू
भिंगारमध्ये निवृत्त लष्करी जवानाकडून हवेत गोळीबार

प्रतिनिधी संगमनेर

संगमनेर नगर परिषद व राष्ट्रीय सेवा योजना , संगमनेर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने माझी वसुंधरा अभियान  अंतर्गत पर्यावरण  संरक्षण व संवर्धन जनजागृती साठी संगमनेर शहरात विविध ठिकाणी पथनाट्य संपन्न झाले .या प्रसंगी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे ,मुख्याधिकारी राहुल वाघ, महाविद्यालयाचे प्राचार्य अरुण गायकवाड, उपप्राचार्य डॉ.वींद्र, ताशीलदार राष्ट्रीय सेवा योजना चे जिल्हा समन्वयक डॉ.प्रताप फलफले ,,डॉ.सचिन कदम, डॉ. वसंत खरात ,डॉ. रोशन भगत डॉ.बाळासाहेब पालवे प्राध्यापक सागर श्री मंदिलकर, स्वयंसेवक प्रतिक पावडे ,विशाल राऊत, शरद शेळके, नगर परिषदेचे सहाय्यक कार्यालय निरिक्षक राजेंद्र गुंजाळ ,नौडल अधिकारी प्रमोद लांडे आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील सर्व नगरपरिषदांमध्ये माझी वसुंधरा अभियानांतर्गत पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी प्रोत्साहनपर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदरच्या स्पर्धेत संगमनेर नगर परिषद सहभागी असून माझी वसुंधरा अभियानांतर्गत जल, वायू ,ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी नगरपरिषदेच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहे. नगराध्यक्षा सौ .दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखालील तसेच मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध भागात वृक्षारोपण ,ओला व सुका कचरा वर्गीकरण, सार्वजनिक स्वच्छता ,विजेवर चालणाऱ्या वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन आदी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यांसह नगरपरिषदेने पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी  गणेशोत्सव विसर्जन काळात निर्माल्य व इतर वस्तू नदीत न टाकता त्यांचे संकलन करण्यात आले व त्यावर प्रक्रिया करून त्यापासून सेंद्रिय खत तयार करण्यात येऊन पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यात आला .त्यासाठी शहरातील विविध सामाजिक संस्थांचा सहभाग लाभला.

याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना नगराध्यक्ष .सौ. दुर्गाताई तांबे म्हणाल्या ,पृथ्वी ,जल, वायू चे प्रदूषण रोखण्यासाठी सामुदायिक प्रयत्न होणे आवश्यक आहे .यासाठी नागरिकांचा सहभाग अवश्यक आहे .या पथनाट्याच्या माध्यमातून ओल्या व सुक्‍या, कचऱ्याचे वर्गीकरण, प्लास्टिक वापरामुळे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम ,पाण्याचे प्रदूषण, वृक्षारोपण व संवर्धन , यांसारख्या विविध विषयांवर पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली .असे विविध विषय हाताळताना पथनाट्य हे प्रभावी माध्यम ठरणार आहे नागरिकांना या माध्यमातून निश्चितच प्रबोधन होणार असून शहरातील नागरिकांनी देखील नगरपरिषदेने वृक्षा रोपण केलेल्या झाडाचे संरक्षण व संवर्धन करणे आवश्यक आहे .याप्रसंगी संगमनेर महाविद्यालयाच्या वतीने सादर करण्यात आलेल्या पथ नाट्यातील कलाकारांचे व प्राचार्यांचे त्यांनी कौतुक करून आभार मानले. पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी संगमनेर नगरपरिषदेच्या वतीने भविष्यात अनेक उपक्रम आयोजित करणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

COMMENTS